ट्रेण्डिंगबातम्याशेती कट्टा

आजोबांनी विकलेली जमीन परत कशी मिळवावी? जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती(Land sold)

जमिनीच्या बाबतीत अनेक प्रकारचे वाद-विवाद असतात. बरेचदा आपल्या आजोबांची जमीन विकलेली असते व अशा विकलेल्या जमिनीच्या बाबतीत देखील बरेच वाद निर्माण होतात. परंतु आपल्या आजोबांनी विकलेली जमीन परत कशी मिळवायची या प्रश्नाला अनेक प्रकारच्या बाजू आहेत.(Land sold)

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जमीन वडिलोपार्जित होती ची आजोबांची स्वकष्टाची होती? तसेच त्यांनी जो विक्रीचा व्यवहार केला आहे तो कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे? त्या व्यवहाराला कायद्याच्या आधाराने आव्हान देता येऊ शकते का किंवा नाही अशा प्रकारच्या बाजू अशा प्रकरणांमध्ये असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर जमीन जर वडीलोपार्जित असेल तर त्या जमिनीचा वडिलांचा हिस्सा विकण्याचा अधिकार निश्चितपणे आहे.पण त्यांनी जर सगळ्यांचा हिस्सा विकून टाकला असेल तर अशा परिस्थितीत निश्चितपणे आव्हान देता येते.(Land sold)

यामध्ये दुसरे महत्त्वाचे असे की, जर त्यांनी एखादा करार करून दिलेला असेल आणि तोंडी करार असेल किंवा नोंदणीकृत करारअसेल किंवा त्या करारामध्ये इतर काही कायदेशीर त्रुटी असतील तर त्या व्यवहाराला सुद्धा आव्हान देऊन तो व्यवहार रद्द करून घेता येऊ शकतो.यावरून असे दिसून येते की, आजोबांनी विकलेल्या जमिनीची मालकी ही नेमकी वडिलोपार्जित होती की स्वकष्टार्जित आहे? जर त्यांनी कराराने व्यवहार केला असेल तर संबंधित करारहा वैध व कायदेशीर आहे की अवैध व बेकायदेशीर आहे? या सगळ्या प्रश्नांचा उत्तरावर आणि परिस्थितीवर जमीन आपल्याला परत मिळू शकते किंवा नाही हे अवलंबून आहे.(Land sold)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!