जागतिक कट्टाट्रेंडिंगबातम्या कट्टा

Titanic Submarine : बेपत्ता टायटन पाणबुडीतील ‘त्या’ 5 जणांचा मृत्यू! मोहीम काय होती? जाणून घ्या

Missing Titanic submarine : बेपत्ता टायटन पाणबुडीमधील स्फोट होऊन पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ओशनगेट एक्सपीडिशन्सने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपला पायलट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टॉकटन रश, प्रवासी शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल हेन्री नार्गोलेट यांना गमावले आहे.

तब्बल १११ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. पाणबुडीच्या बाह्य आवरणासह तिचे काही अवशेष सापडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रविवारी पाणबुडी बेपत्ता झाली होती. या पाणबुडीमध्ये ९६ तास म्हणजेच चार दिवस पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक होता. शोधकार्य सुरु असलेल्या भागात डेब्रीज सापडल्याचे यूएस कोस्ट गार्डने आधीच स्पष्ट केले आहे. टायटॅनिकच्या ढिगाऱ्याजवळ रिमोट-नियंत्रित अंडरवॉटर सर्च वेहिकलने या डेब्रीज शोधल्या होत्या.

Titanic Submarine मोहीम काय होती?

पर्यटकांना टायटॅनिक बोटीचे अवशेष दाखवणारी पाणबुडी ओशनगेट एक्सपीडिशन्सकडून चालवली जाते. खोल समुद्रात मोहिमा राबवण्याचं काम कंपनीकडून केलं जातं.

बुडालेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. कॅनडाच्या न्यूफाऊंडलँडमध्ये उत्तर अटलांटिकच्या तळाशी असलेले जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. टायटॅनिकचे अवशेष ३८०० मीटर खोलवर आहेत. यासाठी एका पर्यटकाला २ कोटी रुपये मोजावे लागतात.

Titanic Ship 3D Scan : संपूर्ण टायटॅनिक जहाजाचं डिजिटल स्कॅन तुम्ही पाहिलंत? | BBC News Marathi

टायटॅनिक जहाज नेमक आहे कुठे?

टायटॅनिक जहाज १५ एप्रिल १९१२ रोजी समुद्रात बुडालं. या दुर्घटनेत १५०० जणांचा मृत्यू झाला. हिमनगाला आदळल्यानंतर जहाजाचे दोन तुकडे झाले. टायटॅनिकचे अवशेष ३८०० मीटर खोलवर आहेत. कॅनडाच्या न्यूफाऊंडलँडमध्ये उत्तर अटलांटिकच्या तळाशी टायटॅनिकचे अवशेष आहेत. ते पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीत एकूण पाच जण होते. त्यात एक पायलट आणि चार मिशन स्पेशालिस्ट आहेत.

हिमनगाला आदळल्यानंतर जहाजाचे दोन तुकडे झाले. टायटॅनिकचे अवशेष सागराच्या तळाशी आहेत. त्याबद्दल पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता असते. ते पाहण्यासाठी पर्यटक पाणबुडीतून हजारो मीटर खोल समुद्रात जातात. चार पर्यटकांना घेऊन गेलेल्या पाणबुडीचा संपर्क केप कोडच्या पूर्वेला ९०० मैल अंतर कापल्यानंतर तुटला. अशा भागात शोध मोहीम राबवणं अतिशय आव्हानात्मक असतं.

ओशनगेट एक्सपीडिशन्सने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपला पायलट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टॉकटन रश, प्रवासी शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल हेन्री नार्गोलेट यांना गमावले आहे.

जहाजाचे ऑपरेटर ओशनगेट एक्स्पिडिशन्स म्हणाले, “आमची अंतःकरणे या पाच आत्म्यांसोबत आहेत.”

Lust Stories 2 Trailer : तमन्ना भाटियाने पहिल्यांदाच या अभिनेत्या सोबत दिले इंटीमेट सिन्स ! बोल्ड डायलॉग्स चर्चेत

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button