MPSC कट्टाPuneट्रेंडिंगनोकरी कट्टाबातम्या कट्टामहाराष्ट्रशिक्षण कट्टा

Talathi Bharti 2023 : तलाठी पदाच्या 4644 पदाची जाहिरात आली ! तलाठी वेतन, परीक्षा दिनांक, स्वरूप, फी जाणून घ्या

Talathi Bharati 2023 : राज्यात ४६४४ तलाठी पदाच्या भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही पदभरती ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून होणार असून कुठल्याही शाखेतील पदवीधराला यासाठी २६ जून ते १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

पदाचे नाव : तलाठी

विभाग : महसूल व वन विभाग, महाराष्ट्र राज्य

वेतन श्रेणी (Talathi Salary) : 25500 – 81100 रु/- (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते )

एकूण पदे : 4644

परीक्षा दिनांक :

 • याबाबतची माहिती https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणेत येईल. तसेच उमेदवाराच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.
 • जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in या लिंकवर उपलब्ध आहे.

Talathi Bharti महत्वाच्या तारखा :

अर्ज करणे सुरु होणे दिनांक : 26/06/2023

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 17/07/2023

शैक्षणिक अर्हता (Talathi Bharti Educational Qualification) :

 • कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
 • मराठी भाषा ज्ञान असणे आवश्यक.

अधिक माहितीसाठी नोटीफिकेशन जरूर वाचा.

पात्रता : भारतीय नागरिकत्व

वयोमर्यादा ( Age Limit for Talathi Bharti 2023) :

 • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : 17/07/2023
 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा : 18- 38 वर्षे
 • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा : 18- 43 वर्षे
 • इतर प्रवर्गासाठी व अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन जरूर वाचा

तलाठी परीक्षेचे स्वरूप व कालावधी (Talathi Exam Paper Pattern ) :

 • दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून ती वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे.
 • एकूण गुणांच्या ४५ टक्के गुण घेणे आवश्यक राहणार आहे.
 • परीक्षा एकूण 200 मार्कांची असणार आहे
 • परीक्षा कालावधी : 2 तास

परीक्षा शुल्क :

खुला प्रवर्ग : 1000 रुपये/-
मागासवर्गीय व दुर्बल घटक : 900 रुपये/-

पेमेंट पद्धत : ऑनलाईन

महत्वाच्या लिंक्स :

Notification येथे क्लीक करा
Official Websiteयेथे क्लीक करा
Apply Onlineयेथे क्लीक करा

जिल्हा केंद्र निवड :-

 • प्रस्तुत परीक्षेकरीता विविध जिल्हा (परीक्षा) केंद्राचा तपशील https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा योजना / पध्दती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
 • अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
 • जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
 • जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरूपी रहिवास पत्याचे आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेशपत्र देण्यात येईल

Nilesh Lanke Prabodhini : संपूर्ण तलाठी भरती बॅच आता फक्त ९९९रु मध्ये! विश्वास नाही बसत..वाचा सविस्तर

.

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button