PuneThaneआरोग्य कट्टाट्रेंडिंगमुंबई

Precautions to be taken during Monsoons : हे वाचा! पावसाळयात देखील आरोग्य राहील उत्तम

Precautions to be taken during Monsoons :पावसाळा आला म्हटलं की विविध साथींचे रोग (Epidemiological diseases) तसेच जंतुसंसर्ग (Infection) होण्याची शक्यता जास्त असते. पाऊस एका बाजूने हवाहवासा वाटतो, तर दुसऱ्या बाजूने पावसाळ्यामुळे होणारी गैरसोय नकोशी वाटते. त्यातून पावसाळ्यातील आजारपण (Monsoon sickness) तर अगदीच नकोनकोसे करणारे असते. पावसाळ्यात आपण कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी ते बघूयात

थंड हवा, वादळ-वारा, हवेत वाढलेली आर्द्रता, ढगांमुळे अडवला गेलेला सूर्यप्रकाश या सर्वांचा सामना पावसाळ्यात करावा लागतो. सर्दी, ताप, खोकला, साथीचे रोग, दम्याचा त्रास, अंगदुखी, कंबरदुखी, दूषित हवा-पाणी-अन्नामुळे निरनिराळ्या प्रकारचे जंतुसंसर्ग होऊ शकतात. मात्र, हे सर्व होऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना करता येते. 

पाणी उकळून प्यावे आणी फायदे? (Drink Boiled Water and Benefits?)

पाण्यामार्फत जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी पाणी उकळून घेण्याची पद्धत सर्वोत्तम होय. दिवसभर पिण्यासाठी, तसेच ताक वगैरे करताना आवश्‍यक असणारे पाणी उकळून घेतलेले असावे. यासाठी पाण्याला उकळी फुटल्यावर १५-२० मिनिटांसाठी उकळत ठेवावे, उकळताना त्यात वावडिंग, सुंठ, अनंतमूळ यांसारख्या जंतुनाशक, पाचक व सुगंधी वनस्पतींचे एक-दोन चिमूट चूर्ण किंवा तयार ‘जलसंतुलन’ टाकले, तर ते अधिक प्रभावी ठरते. या प्रकारे उकळलेले आणि वनस्पतींनी संस्कारित पाणी प्यायल्यास जंतुसंसर्गास प्रतिबंध होतोच, पण असे पाणी पचण्यास हलके असल्याने पचनसंस्थेसाठीसुद्धा हितावह असते. 

घरातील हवा शुद्ध ठेवा (Keep the Indoor Air Clean)

पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने अन्न नासण्याची, बुरशी वगैरे येण्याची शक्‍यता अधिक असते. त्या दृष्टीने अधिक खबरदारी घ्यायला हवी. अन्न-पाण्यामार्फत जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेणे हे आपल्या हातात असते, सोपे असते. तसेच, घरातील हवा शुद्ध राहण्यासाठी सकाळ-संध्याकाळ विशिष्ट द्रव्यांचा उदा. ऊद, गुग्गुळ, ओवा, कडुनिंब, अगरू, चंदन, कोष्ठकोळिंजन, विडंग वगैरे द्रव्यांचा किंवा तयार ‘संतुलन प्युरिफायर’ धूप करता येतो. 

सर्दी-खोकला यापासून कसे दूर राहता येईल? (How to avoid cold and cough?)

वारंवार सर्दी-खोकला होणाऱ्यांना पावसाळ्यामध्ये खोकला होण्याची किंवा दमा असणाऱ्यांना दम्याचा अटॅक येण्याची अधिक शक्‍यता असते. अशा व्यक्‍तींनी पावसाळा सुरू होणार, अशा चिन्हे दिसू लागताच सितोपलादी चूर्ण, ‘प्राणसॅन योग (वैद्यांच्या सल्ल्याने)’, कफ सिरप वगैरे औषधे सुरू करणे चांगले. यामुळे प्रतिकारशक्‍ती चांगली राहते, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते. छाती व पाठीला अगोदर तेल लावून ओव्याच्या पुरचुंडीने किंवा रुईच्या पानांनी शेकल्यास त्यानेही छातीत साठलेला कफ मोकळा व्हायला आणि दम कमी व्हायला मदत मिळते. 

पावसाळ्यात मधुर, आंबट व खारट चवीचे अन्न खाणे योग्य असते. मधुर रस वात शमवतो, पित्त कमी करतो आणि ताकदही वाढवतो. पचायला जड पडणार नाही, असे मधुर चवीचे पदार्थ पावसाळ्यात खाणे योग्य असतात.

पावसाळ्यात आले, सुंठ यांचा शक्‍य तेथे वापर करणे चांगले असते. उदा. आमटी, कढी किंवा सूप बनविताना मिरचीऐवजी आले टाकता येते. ताकात किसलेले आले टाकता येते. चहामध्ये किसलेले आले, गवती चहा टाकल्यास चवही उत्तम लागते व आरोग्याच्या दृष्टीनेही हितकर असते. 

अशा प्रकारे आहार, औषध व आचरणात आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाचा अंतर्भाव केला, तर पावसाळ्यासारखा अवघड ऋतू कधी संपला, हे कळणारही नाही, उलट पावसाचा आनंद घेता येईल.

Krushi Sevak Bharti : राज्यात 2000+ कृषी सेवकांची मोठी मेगा भरती ! वाचा संपूर्ण माहिती

Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट होतेय? मग डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ ५ टिप्स करा फॉलो

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button