Chhatrapati Sambhaji NagarKolhapurNagpurNashikPuneThaneट्रेंडिंगनोकरी कट्टाबातम्या कट्टामहाराष्ट्रशेती कट्टा

Krushi Sevak Bharti : राज्यात 2000+ कृषी सेवकांची मोठी मेगा भरती ! वाचा संपूर्ण माहिती

Krushi Sevak Bharti 2023 : कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषि सेवक पदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील २ हजार ५८८ रिक्त पदे विचारात घेता याच्या ८० टक्के म्हणजे २ हजार ७० पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला असून शासनाची मान्यता प्राप्त होताच जाहिरात व पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

चव्हाण म्हणाले, कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त ‘गट – क’ मधील विविध संवर्गातील सरळसेवा पदभरतीबाबत प्रक्रिया सुरू झाला असून, त्याची जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. तसेच पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाहीदेखील अंतिम टप्यात आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार वाहनचालक व ‘गट – ड’ संवर्गातील पदे वगळून इतर सरळसेवा कोट्यातील रिक्तपदांच्या 80 टक्के मर्यादित पदभरती करण्यात येणार आहे.

‘गट – क’ संवर्गातील सरळसेवा पदभरती आयबीपीएस कंपनीमार्फत राबवण्यास शासन मान्यता मिळाली आहे. या संस्थेसोबत सामंजस्य करारदेखील करण्यात आला आहे . त्यानुसार वरिष्ठ लिपिक , सहायक अधीक्षक , लघुलेखक ( निम्नश्रेणी ) व लघुलेखक ( उच्चश्रेणी ) या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे .

Talathi Bharti 2023 : तलाठी पदाच्या 4644 पदाची जाहिरात आली ! तलाठी वेतन, परीक्षा दिनांक, स्वरूप, फी जाणून घ्या

पेसा क्षेत्रातील पदे भरणार ! ( Krushi Sevak Bharti 2023)

राज्यपालांच्या 29 ऑगस्ट 2019 च्या अधिसूचनेनुसार अनूसुचित आदिवासी क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यामध्ये कृषी सहाय्यक संवर्गाचा समावेश आहे.

शासन निर्णयानुसार विभागीय कृषी सहसचालक ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व पदसंख्या निश्चित करण्याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासकीय विभागाची पदासाठी मान्यता प्राप्त करून घेण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जाहिरात देणे शक्य झालेले नाही. मात्र, मान्यता मिळताच भरतीसंदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

कृषी सेवक म्हणजे काय? (Krushi Sevak Meaning)

तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यासोबत ‘कृषी सेवक‘ हे गाव पातळीवरील महत्त्वाचे पद आहे. शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देऊन सरकारी योजना त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृषिसेवक हे पद महत्वाचे आहे.

सरकारच्या कृषी विभागामार्फत गाव पातळीवर कृषी योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे प्रमुख काम कृषी सेवक यांच्याकडून होते. तसेच कृषि शिबिरांचे आयोजन करणे, माती परीक्षण कार्यशाळा, आवश्यकतेनुसार शेती पिकांची पाहणी करून अहवाल तयार करणे अशा स्वरूपाच्या कामाची जबाबदारी कृषी सेवकांवर असते.

कृषी सेवक पदासाठी वयोमर्यादा (Krushi Sevak Age Limit)

सरकारी भरतीसाठी शासनाने वेळोवेळी ठरवलेली कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्ष (आरक्षण व इतर प्रवर्गातील जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत) वयोमर्यादा लागू आहे.

कृषी सेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता (Krushi Sevak Qualification)

  • कृषी सेवक या पदासाठी उमेदवार हा कृषी पदविका डिप्लोमा किंवा समतुल्य पदवी धारक असावा.
  • कृषी सेवक पदासाठी संगणकाची व परिपूर्ण माहिती असलेल्या MS-CIT कोर्स पूर्ण असणे किंवा नियुक्ती झाल्यापासून दोन वर्षात एमएस-सीआयटी कोर्स करून पूर्ण करणे आवश्यक आहे.

१० वी पास उमेदवारांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! महिना २१ हजारांहून अधिक पगार मिळणार, जाणून घ्या सविस्तर

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button