ट्रेंडिंगफॅशनमनोरंजन कट्टा

Adipurush Collection Day 4 : 500 करोड बजेट असलेल्या आदिपुरुषची कमाई किती झाली? जाणून घ्या

प्रभास, कृति सेनन आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असेला चित्रपट ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie) याला रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. 16 जून रोजी रिलीज झालेल्या आदिपुरुष सिनेमाबाबत सध्या माध्यमांमध्ये टिका होत आहे.

खास करून फिल्म मधील डायलॉग तसेच फिल्म मधील पात्र यांवर जोरदार टिका केली जात आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील समोर येत आहे.

हे सुरू असताना ओम राऊत ( Om Raut) दिग्दर्शित Adipurush पिक्चरला पहिल्या दिवशी चांगली कमाईचा रेकॉर्ड बनवता आला. ज्या पद्धतीने सध्या चित्रपटावरती टीका होत आहे त्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाई वरती होत आहे.

आतापर्यंत आदिपुरुष पिक्चर ने पहिल्या (Adipurush Movie Collection) तीन दिवसांमध्ये 221.1 करोड रुपयांची कमाई केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाने पहिल्या सोमवारी सगळ्या भाषांमध्ये मिळून एकूण कमाई 16 कोटी रुपये (Adipurush Movie Collection Day 4) इतकी केली आहे. यामध्ये हिंदी भाषेतून या चित्रपटाला 8.5 करोड रुपये कमावता आले. पण एकंदरीत जर बघितलं सध्या आदिपुरुषच्या कमाई मध्ये तीन दिवसांपासून घट होत आहे.

Adipurush Movie Review : बहुचर्चित असलेला आदिपुरुष, पण प्रेक्षकांच्या अपेक्षेला कमी पडला

‘आदीपुरुष’ या चित्रपटाचं एकूण बजेट 500 करोड रुपयेच्या जवळपास आहे मागच्या तीन दिवसांमध्ये या चित्रपटाचं कमाई चांगली होती पण चौथ्या दिवशी कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात घट बघायला मिळाली आहे.

एकूण चार दिवसांमध्ये या चित्रपटाने 241 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Sacnilk नुसार वर्ल्ड वाईड कलेक्शन जर बघितला तीन दिवसांचा जवळपास 302 करोड रुपये इतकी आहे.

चित्रपट गृहांची स्थिती :

सोमवारी हिंदी चित्रपट गृहांमध्ये 12.66% प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळाली. तेलगू चित्रपट गृहांमध्ये ही उपस्थिती जवळपास 30.06% एवढी होती.

Nashik Jagannath Puri Rath Yatra 2023 : जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर नाशिकमध्ये पहिल्यांदाच जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button