IPL 2023खेळ कट्टाट्रेंडिंगबातम्या कट्टा

ICC World Cup 2023 Time Table : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर !

 ICC World Cup 2023 Time Table : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चे वेळापत्रक ICC कडून जाहीर करण्यात आले आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत.

यजमान असल्याने भारताला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका २०२०-२३ ICC क्रिकेट विश्वचषक सुपर लीगद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सध्या झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीतून आणखी दोन संघ स्पर्धेत प्रवेश करतील.

२०१९ च्या अंतिम फेरीच्या पुनरावृत्तीसह ५ ऑक्टोबर रोजी विश्वचषकाला सुरुवात होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड (Eng vs NZ World Cup First Match) यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. यजमान संघ भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ५ वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. तर भारत आणि पाकिस्तानमधील (IND vs PAK on 15th OCT 2023) पहिला सामना १५ ऑक्टोबर २०२३ ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

प्रत्येक संघ राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये इतर नऊ संघांशी खेळेल ज्यात अव्वल चार संघ बाद फेरी आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येईल तर अंतिम सामना रविवारी १९ नोव्हेंबरमध्ये अहमदाबाद येथे होईल.

ICC World Cup 2023 TImetable

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

पहिला सामना – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई

दुसरा सामना – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली

तिसरा सामना – भारत विरुद्ध पाकिस्तान, १ ऑक्टोबर, अहमदाबाद

चौथा सामना – भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे

पाचवा सामना – भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला

सहावा सामना – भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ

सातवा सामना – भारत विरुद्ध क्वालिफायर २, २ नोव्हेंबर, मुंबई

आठवा सामना – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता

नववा सामना – भारत विरुद्ध क्वालिफायर १, ११ नोव्हेंबर, बेंगळुरू

आयसीसी विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघ (घोषणा) :
आतापर्यंत बीसीसीआयने आयसीसी विश्वचषक २०२३ साठी खेळाडूंची यादी जाहीर केलेली नाही. रोहित शर्मा (क), हार्दिक पंड्या (वि.), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.हे ICC विश्वचषक 2023 संघाचा भाग आहे.

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana : 6000 च्या ऐवजी मिळणार 12000 रुपये!

Pakistan ICC World Cup 2023 Full Schedule : फुकटचा आरडाओरडा करणाऱ्याा पाकिस्तानला आयसीसीने दाखवून दिली जागा

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button