मार्केट कट्टा

कोण आहेत भारत पारेख?

वयाच्या १८ व्या वर्षी पारेख यांनी पॉलिसी विकायला सुरुवात केली. मग तो कॉलेजच्या वर्गानंतर विमा विकायचा. भारत पारेख यांची कमाई एलआयसीच्या चेअरमनच्या बरोबरीची असल्याचे बोलले जाते. सुमारे तीन दशकांपासून, पारेख हे जगातील आघाडीच्या जीवन विमा आणि वित्तीय सेवा व्यावसायिकांच्या समूहाचे सदस्य आहेत. त्यांना शाळा, महाविद्यालये, बँका आणि व्यवस्थापन शाळांमध्ये भाषण देण्यासाठी आमंत्रित केले जाते.

LIC पोलिसी ही खूप लोकप्रिय आहे. LIC एक सरकारी संस्था आहे, त्यामुळे लोकांचा विश्वासही खूप जास्त आहे. तर एलआयसी लोकांचा विमा काढण्यासाठी एजंट्सची नेमणूक करते. या एजंटना LIC द्वारे प्रत्येक विमा पॉलिसीवर कमिशन देखील दिले जाते. एलआयसीच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमिशनमुळे काही एजंट करोडपतीही झाले आहेत. यापैकी एक नाव भारत पारेख यांचेही आहे. भारत पारेख हे एलआयसीचे एजंट असून त्यांची कमाई करोडोंमध्ये आहे.

पारेख म्हणतात की, “भारतात तुम्हाला अंत्यसंस्काराला जाण्यासाठी कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नसते. पार्थिव घेऊन जाणाऱ्या लोकांकडे पाहूनच तुम्ही शोकसागरात बुडालेल्या कुटुंबाला ओळखू शकता. तुम्ही मृताच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला भेटता आणि त्यांना तुच्याबद्दल सांगता. तुम्ही त्यांना सांगा की, मृत्युमुखी पडलेल्याच्या विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळवण्यासाठी मी मदत करेन आणि तुम्ही त्यांच्याकडे तुमचं कार्ड सोडून जा.”

तेरावं झाल्यावर कुटुंबातील काही सदस्य त्यांना फोन करतात. मात्र, बऱ्याच लोकांना ते घरात जाऊनच भेटतात. पारेख नेहमी ही खबरदारी घेतात की, डेथ क्लेम वेळेवर सेटल झाला पाहिजे.
पारेख लोकांना विचारतात की, एखाद्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर काय आर्थिक आघात झाला, त्यांनी कुठला विमा घेतलाय का आणि त्यांच्याकडे बचत किंव गुंतवणूक केलेली आहे का?

पारेख म्हणतात की, “कुणाही कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास त्यांचं दु:ख मला कळतं. मी लहान असतानाच, माझ्या वडिलंना मी गमावलं आहे.”

भारत पारेख LIC च्या स्टार एजंट्सपैकी एक आहेत. ते इतर उत्साही सेल्समनसारखेच पॉलिसीच्या फायद्यांबद्दल लोकांना सांगत असतात. आतापर्यंत त्यांनी 32.4 कोटी डॉलरच्या पॉलिसी विकल्या आहेत. यातील सर्वाधिक पॉलिसीधारक महाराष्ट्रातील नागपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत.

पारेख सांगतात की, “आतापर्यंत 40 हजार पॉलिसी विकल्या आहेत आणि यातील एक तृतीयांश कमिशन मिळतं. यासोबत प्रीमियम जमा करण्याची आणि क्लेम सेटल करण्याची सेवा मोफत देतो.”
हा असा व्यवसाय आहे, ज्यात कुणी सेलिब्रिटी नाही, तरी त्यात भारत पारेख हे एखाद्या स्टारसारखेच आहेत.

भारत पारेख यांनी एक पुस्तक लिहिलंय, त्यातील एका भागात बचतीबाबत सल्ले दिलेत आणि दुसऱ्या भागात त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल लिहिलंय. त्यात वॉल्ट डिस्नेचं वाक्य लिहिलंय – ‘जर तुम्ही एखादं स्वप्न पाहत असाल, तर ते पूर्णही करू शकाल.’
पारेख यांच्या यशामागे हाच विचार आहे. मिल वर्कर आणि गृहणी आईचा मुलगा असलेल्या भारत पारेख यांच्या खऱ्या आयुष्यात खरंतर स्वप्न पाहण्याचीकी कुवत नव्हती.
ते 200 स्केअर फुटांच्या घरात आई-वडिलांसोबत राहत होते. शेजारीच त्यांचे आठ आणखी नातेवाईक राहत होते. आयुष्य अत्यंत खडतर होतं. सर्व भावंडं मिळून अगरबत्त्या बॉक्समध्ये पॅक करण्याचं काम करत असत. जेणेकरून गरजा पूर्ण व्हाव्यात.

जेव्हा भारत पारेख 18 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांनी कॉलेज करता करता इन्श्योरन्स विक्रीस सुरुवात केली. सायकलवरून फिरून ते संभाव्य क्लायंट्सना शोधत असत. यावेळी त्यांची बहीण कागदपत्रांचं काम सांभाळत असे.
पॉलिसी विकण्यासाठी ते क्लायंटसमोर घरोघरी बोलणाऱ्या भाषेचा वापर करत असत.

LIC: How the dead helped a salesman to become a star agent

“विमा त्या अतिरिक्त टायरसारखा आहे, ज्याची आवश्यकता गाडी पंक्चर किंवा ब्रेकडाऊन झाल्यानंतरच पडते.”
भारत पारेख यांनी हेच वाक्य त्यांच्या ग्राहकांना सांगितलं होतं. ग्राहकाने पॉलिसी खरेदी केली आणि पारेख यांना यासाठी 100 रूपये कमिशन मिळालं.

पहिले सहा महिने पारेख यांनी पॉलिसी विकल्या. या कामाचं वर्षाकाठी त्यांना 15 हजार रूपये मिळाले. हे सर्व पैसे त्यांनी घरात दिले.
हे सरलेले दिवस आठवत पारेख म्हणतात की, “विमा विकणं कठीण होतं. अनेकदा घरी परतल्यावर रडत असे.”

विमा एजंट्सची प्रतिमा कायमच वाईट रंगवली जाते. त्यांना एखाद्या शिकाऱ्यासारखं समजलं जातं, जो ग्राहकांच्या अडचणींचा फायदा घेतो.

मात्र, पारेख या अडचणींना घाबरले नाहीत. वर्षागणिक ते चांगलं काम करण्याच्या प्रयत्नात राहिले.

आता रस्त्याकडेला स्टॉल लावणाऱ्या व्यावसायिकापर्यंत, सर्व त्यांचे ग्राहक आहेत.

Also Read : मोबाईल मधून 5 मिनिटात कर्ज कसे काढायचे | How to get a loan in 5 minutes

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button