मनोगतसंपादकीयसामाजिक कट्टा

थोडस मी जिवणालाच कंटाळलो होतो…

थोडस मी जिवणालाच कंटाळलो होतो.जुन्या जखमांनी तोंड वर काढलं की मनस्थिती रक्तभंबाळ होत होती.स्वतःनी स्वतःला देलेले शब्द आज मला खायला उठले होते. गेल्या अकरा वर्षाचा काळ माझ्या पुढ्यात घोगावत होता. ना जीवनाला दिशा होती ना वेग होता. विचारांचं चक्र डोक्यात चालू असताना स्वारगेट बस स्टँड आलेलं माझ्या लक्षात आलं नाही. डोळे अर्धवट उघडे होते. कंडाक्टर जवळ येऊन शेवटचा स्टॉप म्हणून जोरात ओरडला आणि माझ्या विचारांची तंद्री तुटली.तान तणावाच्या वातावरणातून थोडासा विसावा मिळवा म्हणून मी ताई कडे करमाळ्याला जायचं ठरवलं होत. story of life

स्वारगेट बस स्थानावर स्वारगेट – करमाळा बस लागलीच होती. एक रिकाम्या शिट वर मी बसलो,थोड्या वेळाने डोक्यावर पटका, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा,धोतर शर्ट असा पोशाख परिधान केलेले साधारण ७०-७५ वय असलेलं आजोबा जवळ येऊन बसले.बस चालू झाली तिने तिचा मार्ग पकडला आणि माझ्या मनाने पुन्हा मागच्या अकरा वर्षांचा वायू वेगाने वेध घेयला सुरुवात केली.कितीही गोळा बेरीज केली तरी हातात मात्र वाजाबकीच राहत होती तसे माझे मन सुन्न होत होत.अतिविचाराच्या दरीत मी कोसळत होतो.इतक्यात शेजारून अचानक आवाज आला.कार पोरा पोरिन धोका दिला की शाळत नापास बिपास झालं हायस एवढा विचार करतोय.या आवाजाने दचकून मी त्यांच्या कडे पाहिले.पण मला बोलण्याची इच्छा नसल्या मुळे.मी फक्त मान हलवून नाही म्हटलं.

त्यांनी लगेच प्रती प्रश्न केला,मग आसा तोंडावर साती आसरा पाडून का बसला आहेस,या शब्दाचा अर्थ कळायला मला थोडा वेळ लागला.पण त्यांच बोलणं चालुच होते.आर मी लय दुनिया पहिली आहे.अनेक उन्हाळ पावसाळ अंगावर घेतले आहेत.उडत्या पाखरांचे पंख मोजणार माणूस मी हाय.मी थोडा विचारात आहे मी एवढच उत्तर दिलं.त्यावर ते बोलले, ईचार तर प्रत्येकाला हाय,तो जन्मा बरोबर येतो आणि आपल्याला घेऊनच जातो.बर ते असुदे मी तुला एक गोष्ट सांगतो बघ. तसा मी सध्या काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो.पण माझ्या कडे दुसरा पर्याय नव्हता मी नाही म्हणायच्या आत त्यांनी गोष्टीला सुरुवात केली होती.
आटपाट नावाचं एक गाव होत. शिवा नावाचं एक बिन आई बापाचं पोर बिगर लग्नाचं होत. सगळ्या गावांनी मिळून त्याच एका दूरच्या नात्यातील एका पोरिशी लग्न लाऊन दिलं.शिवा दिवस भर कामाला बाहेर जायचा,घरात ही एकटीच बिचारी.बोलायला कोण नाही स्वतःच्या मनातलं सांगावं आस कोण नाही. story of life

दिवसभर बिचारी एकटीच बसायची.एक दिवस तिने कापडाच्या चींध्य वापरून एक भावला बनवला आणि त्या भावल्याला स्वतःची सासू मानलं.रोज जेवण करताना ती पोरं त्या भावल्याला जवळ घेयची,त्याला ताट वाढायची.आत्याबाई तुम्ही जेवणार का? आत्याबाई चहा घेणार का? थंडीच्या दिवसात अंगावर पांघरून घालायची, आत्याबाई तुम्हाला थंडी वाजत आहे का? विचारायची.हे तिचं रोज चालू होत.नवऱ्यान पहिल्यांदा हिच्या गोष्टी कडे दुर्लक्ष केलं. पण हीच आणि आत्याबाईच नात वाढत गेलं आणि ती नवऱ्याकडे दुर्लक्ष करायला लागली.तीच आत्याबाईच येड जस वाटत गेलं तसा नवरा वैतागला,एकदा दोघांचं कडाक्याचं भांडण झालं.नवऱ्याने तिला आणि भावल्याला घराच्या बाहेर काढलं.अशाच एका रात्री एका जंगलात दोन चोर चोरी करून एका झाडावर सोने मोजत बसले होते.ती बाई तो भावला घेऊन त्या झाडाखाली बसली. तीच आणि तिच्या सासुबईच बोलणं चालुच होत.सासूबाई तुम्ही बऱ्या आहात का? तुम्ही काय खाणार.हे बोलणं झाडावरील चोरांनी ऐकलं आणि त्यांना ती भूत वाटली.ते सोन तिथेच टाकून पळून गेले.

ही बाई ते सोन घेऊन घरी नवऱ्या कडे आली.सोन पाहून नवऱ्याने ही तिला घरात घेतलं. ही गोष्ट त्याच्या चुलत भावाला समजली.त्याने ही आपली बायको घरातून बाहेर काढली.ती बिचारी अशीच एका जंगलात गेली पण ती एका झाडावर बसली.थोडा वेळ गेल्यावर त्या झाडावर एक एक साप तिला दिसला त्या सापाला पाऊण ती झाडावरून खाली पडली आणि तिचा एक पाय मोडला.त्याच अवस्थेत ती घरी गेली पाय मोडलेला पाहून नवऱ्याला तिला घरात घ्यावं लागलं.
गोष्ट संपली होती गोष्ट जशी संपत होती तसा मी त्या गोष्टीत गुंतत गेलो.गोष्ट संपल्यावर आजोबांनी मला प्रश्न विचारला काय शिकला या गोष्टीतून मी बोललो दुसऱ्याच बघून काय केलं की पाय मोडतो. बस एवढच.पण त्या गोष्टीतील याड या शब्दाने माझ्या मनातील एक कोपरा व्यापला होता.

पुढे आजोबा बोलले जीवनात तुला कशाची अडचण आहे मला माहित नाही,पण कोणतीही गोष्ट करताना स्वतःच्या मनाला विचारुन करायची,स्वतःच्या मनाचा कौल घेयचा.कोणी केली म्हणून आपण करायची नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव घेतलेल्या निर्णयाचा याड लाऊन घेयला विसरायचं नाही.तुला ती गोष्ट कधी आणि किती मिळणार हे तुला त्या गोष्टीचं किती आणि कस याड लागलंय त्यावर आहे. पुढच्या स्टॉप वर ते उतरले विचाराच्या ओघात त्याच नाव विचारायचं राहून गेलं.पण गेल्या अकरा वर्षांच्या प्रवासच उत्तर मला एका शब्दात मिळाल्याचा भास झाला. (story of life) खरंच गेल्या अकरा वर्षात मी माझ्या मनाचे निर्णय घेतले होते पण त्याच वेढ किती घेतलं होत.मुळात या शहाणपणाचा आव आणणाऱ्या दुनियेत याड हा शब्दच तुच्छ मानला होता.
वाटेत अनेक वाटसरु सापडतात पण काही वाटसरु नकळत आपले वाटाडे बनतात.
या अनोळखी वाटाड्याने मला याड या नव्या वाटेची ओळख करून दिली. कारण माझ
याड लाऊन घेयच राहून गेलं होत……

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!