मनोगतसंपादकीयसामाजिक कट्टा

विज्ञान आणि आध्यात्म

विज्ञानाने मानवाला खूप काही गोष्टी दिल्या , खूप काही गोष्टीचा शोध मानवाने लावला..खूप प्रगती केली,आपले जीवन आरामदायी कसे होईल यासाठी वेगवेगळया यंत्राचा शोध लावला. शेती मध्ये असेल, किंवा इतर व्यवसायामध्ये असेल नविन नविन यंत्राचा शोध मानवाने लावला.

ज्यांनी आपले आयुष्य वेचले शोध लावण्यासाठी त्या सर्व व्यक्तींचे मनापासून आभार..तूमच्या मूळे या पृथ्वी वरील व्यवहार करण्यासाठी, उदयोग करण्यासाठी मदत झाली..काही जणांना रोजगार मिळाला. माणूस या भौतिक जगामध्ये रमला.

काही वर्षापूर्वी माणसाकडे वाहन नव्हते, आता तो गाडीचा वापर करू लागला,

आधीच्या स्त्रीया जात्यावर पीठ दळावे लागत असे, आता मशीन च्या साहाय्याने काही वेळातच पीठ तयार होते,

आपल्याला नातेवाईकांना बोलण्यासाठी किती तरी मैल चालत जावून बोलावे लागत असे, आता घरबसल्या मोबाईलच्या सहाय्याने आपण बोलू शकतो.

घरबसल्या एखादा व्यवसाय आपण करू शकतो, घरबसल्या आपण कंपनीमध्ये काम करू शकतो,भरपूर क्षेत्रामध्ये प्रगमी झाली..

सारे जग जवळ आले व परस्पर जोडले गेले पण विज्ञानामुळे आपल्या जीवन आरामदायी होईल पण विज्ञानामुळे आपल्याला माणूसकी, आपूलकी , प्रेम, सदभावना मिळणार नाहीत, आपले जीवन आपण कसे जगायचे ,या जीवनात आपले ध्येय काय आहे ,संस्कार आपल्याला विज्ञानामुळे नाही मिळणार ,आपली प्रगती होत आहे पण आपल्या जीवनात अशांतता, बेचैनी, क्रोध, द्वेष, तिरस्कार ,भ्रष्टाचार, उदासीनता, खोटेपणा,नैराश्य, एकटेपणा, अविचारी मन या सर्व गोष्टी आपल्यात वाढल्या आहेत..यासाठीच तूम्हाल आध्यात्मिक मार्ग सुध्दा माहीत असणे गरजेचे आहे..

जर तूमच्या कडे विज्ञानाची साथ आणि आघ्यात्म असेल तर तूमची प्रगती पण होईल आणि तूमचे मन तूमच्या नियत्रंणात असेल.

विज्ञानामुळे पर्यावरणांचा नाश होत आहे, प्रगती करण्याच्या नादात आपण पर्यावरणाचे समतोल राखण्यात आपयशी झालो आहोत..प्रगती च्या नावाने आपण निसर्गाचे नियम पायदळी तूडवले आहेत..निसर्गातील खूप गोष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत..

पण तूम्ही आध्यात्मिक मार्गाचा जर वापर केलात तर तूम्ही तूमच्या मधील सर्व वाईट गोष्टी संपुष्टात येतील, तूमच्या ईच्छेवर नियंत्रण असेल, तूमची प्रगमी होईल पण कोणाचे नुकसान न करता..सर्व गोष्टीचा विचार करूनच..

आपल्याला वाटत आहे की आपण आधुनिक जीवनात यंत्राचा वापर केला की आपण खूप ज्ञानी झालो तर हे साफ चूकीचे आहे..कारण अजूनही विज्ञानाला आपण कोण आहोत आणि आपला जन्म का झाला आहे याचा शोध लावता आलेला नाही, अजूनही विज्ञानाला आपण मेल्यानंतर कुठे जातो याचा शोध लावता आला नाही..अजूनही आपली आकाशंगंगा का निर्माण झाली ,तिचा हेतू काय आहे हे सांगता आले नाही.ग्रहीतके मांडले आहेत पण सिध्द करता आले नाही..

या गोष्टी जर माहीत करून घ्यायच्या असतील तर त्याला आध्यात्मिक मार्ग वापरला तर आपण त्या गोष्टीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो.

निसर्गाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर आध्यात्मिक आणि विज्ञान या दोन्हीचा वापर करावा लागेल.

शेवटी विज्ञानामुळे प्रगती होते पण मानसिक समाधान ,आपले खरे ध्येय जाणीव घ्येण्यासाठी आणि आपल्यावर संस्कार होण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!