Adipurush Movie Collection : प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया, तरीही केली मोठी कमाई ! वाचा सविस्तर
“आदिपुरुष” चित्रपट (Adipurush Movie) हा 16 जून रोजी प्रदर्शीत झाला. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार प्रभास, क्रीती सनॉन, सैफ अली खान, सनी सिंह आणि देवदत्त नागे यांच्या भूमिका आहेत.
हा चित्रपट पहिल्याच दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला. कारण प्रेक्षकांनी दिलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेला उतरू शकला नाही.
Adipurush Movie Review : बहुचर्चित असलेला आदिपुरुष, पण प्रेक्षकांच्या अपेक्षेला कमी पडला
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने दमदार कमाई केली. पहिल्या दिवशी जगभरातील कमाईचा आकडा (Adipurush Worldwide Collection) तब्बल 140 कोटी रुपये इतके होता. तर दुसऱ्या दिवशी 65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
हिंदी भाषेतील आदिपुरुषची कमाई (Adipurush Hindi Collection ) ही गेल्या दोन दिवसांत जवळपास 37 कोटी रुपये आहे . तर तेलुगू भाषेत दुसऱ्या दिवशी 26 कोटी रुपयांची कमाई झाली.
पहिल्याच दिवशी मोठी कमाई करणाऱ्या चित्रपटात आदिपुरुषचा चौथा क्रमांक लागतो. यामध्ये पहिल्या स्थानी RRR, दुसऱ्या स्थानी बाहुबली 2 आणि तिसऱ्या स्थानी केजीएफ 2 आहे.
RRR- 222 कोटी रुपये
बाहुबली : द कन्क्लुजन- 214 कोटी रुपये
केजीएफ : चाप्टर 2- 164.5 कोटी रुपये
आदिपुरुष- 140 कोटी रुपये
‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंहने शेष, सैफ अली खानने लंकेश आणि देवदत्त नागेनं बजरंग बलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला आहे.