ट्रेंडिंग

New Sansad Bhavan : खासदारांची आसन क्षमता माहिती आहे का?

New Sansad Bhavan Information : या आठवड्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजे 28 मे रोजी नवीन संसद भवनाचं उदघाट्न होणार आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.

सध्या संसद भवनाच उदघाट्न कोण करणार? यावरून सत्ताधारी आणी विपक्ष यांच्यात वाद सुरु आहे.पण या वास्तूची संपूर्ण माहिती आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

नवीन संसद भवनाविषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे

1) सध्याच संसद भवन हे 100 वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. त्यात वेळोवेळी दुरुस्ती केली गेली पण सध्या इमारत खूप जुनी झाली आहे.

2) संसदेची नवीन इमारत 64,500 चौरस मीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेली असेल.

3) त्रिकोणी रचना ही सांस्कृतिक भिन्नतेने प्रेरित आहे.

4) पुढील 150+ वर्षांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणपूरक हरित बांधकाम या ठिकाणी बांधले गेले आहे.

5) नवीन संसद भवनाची एकूण आसनक्षमता पूर्वीपेक्षा 150% जास्त आहे.

जुन्या संसद भवनात लोकसभेत 543 जागा तर राज्यसभेत 250 जागा होत्या तरआता लोकसभेच्या सभागृहात 888 जागा, राज्यसभेच्या सभागृहात 384 जागा, तर संयुक्त अधिवेशनात 1272 खासदार बसणार आहेत.

6) या नवीन संसद भवन निर्माणासाठी 1200 करोड रुपयाचा खर्च आला आहे.

नवीन संसद भवन हे 130 कोटी देशवासीयांच्या आशांना नवी उंची व बळ देणार ठरणार आहे.

ठीक 7 वर्षानांनतर पुन्हा नोटबंदी ? 2000 रुपयाची नोट बंद ? वाचा सविस्तर

Related Articles

Back to top button