ट्रेंडिंग

भारतातील सर्वात प्रसिद्ध १४ आंबे

आपला भारत असा एक देश आहे जिथे विपुल प्रमाणात आंब्याचे उत्पादन करण्यात येते.आपल्या भारत देशात आंबा ह्या फळाला फळांचा राजा ह्या नावाने देखील संबोधित केले जाते.

आंबा हे भारतातील सर्व व्यक्तींचे सर्वात आवडते फळ म्हणून ओळखले जाते.भारतात तुरळकच असे व्यक्ती असतील जे उन्हाळ्यात स्वादिष्ट गोड अणि रसयुक्त अशा आंब्याचे सेवन करत नाही.

विशेषत उन्हाळ्यात एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान बाजारात आंबा हे फळ अधिकतम प्रमाणात उपलब्ध असते.कारण उन्हाळ्यात ह्या फळाचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते.

आजच्या लेखात आपण भारतातील सर्वात प्रसिद्ध अशा आंब्याच्या १४ प्रजाती कोणकोणत्या आहेत हे जाणून घेणार आहोत.

केसर आंबा –

केसर आंबा हा आपल्या भारत देशातील सर्वात प्रसिद्ध आंबा म्हणून ओळखला जातो.हया आंब्याला केसरी आंबा असे देखील म्हणतात.

ह्या आंब्याचा रंग केसर प्रमाणे असतो म्हणून ह्या आंब्याला केसरी आंबा असे म्हटले जाते.केसर आंबा अतिशय गोड असतो त्यामुळे याला आंब्याची राणी ह्या नावाने देखील ओळखले जाते.

केसर आंब्याचा आकार अंडाकृती तसेच मध्यम प्रकारचा असतो.हा आंबा आपल्या पातळ सोनेरी पिवळ्या रंगामुळे तसेच लालसर पणामुळे देखील ओळखला जातो.

अहमदाबाद पासुन ३२० किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या गुजरात मधील जुनागढ येथील गिरणार ह्या टेकडीवर ह्या आंब्याची लागवड अधिक प्रमाणात केली जाते.

हापुस आंबा –

हापुस आंबा भारतातील सर्व आंब्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रसिद्ध असलेला आंबा आहे.हापुस आंब्याला अस्सल आंबा ह्या नावाने संबोधित केले जाते.

कोकणी हापुस आंब्याला बाजारात अधिक मागणी आहे.हया आंब्याचा रंग, सुगंध इत्यादी गोष्टींमुळे ह्या आंब्याची मागणी वाढते.

म्हणुन बाजारात ह्या आंब्याची किंमत अधिक असल्याचे आपणास दिसून येते.बाजारात रत्नागिरी हापुस अणि देवगिरी हापुस ह्या अस्वल आंबे म्हणून ओळखले जात असलेल्या आंब्यांना विशेष मागणी आहे.

हापुस आंब्याची लागवड कर्नाटक, बंगळूर ह्या ठिकाणी देखील केली जाते.पण येथील हापुस आंबा कर्नाटकी हापुस आंबा म्हणून प्रचलित आहे.हे आंबे अस्सल कोकणी हापुस आंबे नसतात.

तोतापुरी आंबा –

तोतापुरी आंबा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांपैकी एक आहे.

तोतापुरी आंब्याला बंगनापल्ली तसेच बंॅगलोर आंबा असे देखील म्हणतात.हया आंब्याला तोतापुरी आंबा असे नाव याच्या आकारामुळे पडले आहे.

तोतापुरी आंब्याचा आकार पोपटाच्या चोचीसारखा असतो अणि याचा रंग देखील हिरवा असतो.हया आंब्याची चव आंबट गोड अशा स्वरूपाची असते.

तोतापुरी आंबा खायला इतका गोड नसतो.हा आंबा लाल रंगाचा असतो जो भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, बंगलोर तामिळनाडू इत्यादी ठिकाणी विशेषतः पिकविला जातो.

कच्च्या तोतापुरी आंब्याचा वापर लोणचे किंवा चटणी तयार करण्यासाठी देखील करण्यात येत असतो.हा आंबा व्यावसायिक प्रक्रियेसाठी अत्यंत लोकप्रिय मानला जातो.

चौसा आंबा –

चौसा आंबा हा आपल्या भारत देशातील अत्यंत प्रसिद्ध आंब्यांपैकी एक आहे.

चौसा आंबा बिहार आणि उत्तर प्रदेश मधील काही भागात मोठया प्रमाणात पिकविण्यात येत असतो.चौसा आंबा हा दक्षिण आशियातील अत्यंत प्रसिद्ध आंबा आहे.

चौसा आंबा काहीप्रमाणात आंबटगोड स्वरुपाच्या चवीचा असतो.हा आंबा चोखुन खाल्ला जात नाही तर हा कापुन खाल्ला जातो.

बाॅम्बे ग्रीन आंबा –

बाॅम्बे ग्रीन आंब्याला बाजारात कैरी आंबा ह्या नावाने देखील ओळखले जाते.

बाॅम्बे ग्रीन आंबा लोणचे तयार करण्यासाठी तसेच इतर पाककृती करीता वापरण्यात येतो.बाॅम्बे ग्रीन आंबा आकाराने लहान अणि गोलसर अशा स्वरूपाचा असतो.

बाॅम्बे ग्रीन आंब्याचे उत्पादन विशेषतः महाराष्ट्र, आंध्र प्रदेश अणि गुजरात मध्ये घेतले जाते.एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान ह्या आंब्याची कापणी करण्यात येते.

बाॅम्बे ग्रीन आंब्याची चव आंबट तुरट अशा स्वरूपाची असते.हे आंबे हलक्या अणि हिरव्या रंगाचे असतात.

हिमसागर आंबा –

हिमसागर आंबा देखील आपल्या भारत देशातील एक प्रसिद्ध आंबा आहे.

हिमसागर आंबा आपल्या गोड चवीसोबत रसाळ गरयासाठी अणि त्याच्या विशिष्ट अशा सुगंधासाठी देखील अत्यंत प्रसिद्ध आहे.हिमसागर आंबा हा मिष्टान्न किंवा शेक तयार करण्यासाठी केला जातो.

हिमसागर आंब्याचे भारतातील पश्चिम बंगाल ह्या राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.हया आंब्याचा आतील भाग पिवळा अणि केशरी रंगाचा असतो.

यात कुठल्याही प्रकारचे फायबर नसते.हिमसागर आंबा मे महिन्यापर्यंत बाजारात खाण्यासाठी उपलब्ध असतो.

रासपुरी आंबा –

रासपुरी आंबा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंबा म्हणून ओळखला जातो.

रासपुरी आंबा हा दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील आंब्याचा एक लोकप्रिय असा प्रकार आहे.हा प्रामुख्याने बंगलोर,कोलार,रामनगरा,तुमकुरू,चिकबल्लारपुरा इत्यादी ठिकाणी पिकवताना आढळुन येतो.

रासपुरी आंबा हा आपल्या गोड चवीमुळे अणि रसाळ भागासाठी विशेषतः प्रसिद्ध आहे.महाराष्ट राज्यात आंब्याच्या ह्या प्रजातीस पायरी आंबा ह्या नावाने देखील ओळखले जाते.

नीलम आंबा –

भारतातील सर्वात प्रसिद्ध आंबा म्हणून नीलम आंब्याला ओळखले जाते.नीलम आंबा हा आकाराने टोकदार असा असतो.नीलम आंब्याचा रंग सोनेरी पिवळा असतो.

नीलम आंब्याची चव आंबट गोड अशा स्वरूपाची असते.याचा सुगंध फुलासारखा आहे.नीलम आंब्याचे उत्पादन प्रामुख्याने कर्नाटक,तामिळनाडू,आंध्र प्रदेश, इत्यादी राज्यात घेतले जाते.

नीलम आंबा जून महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात विक्रीसाठी येत असतो.

दशेरी आंबा –

दशेरी आंबा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांपैकी एक मानला जातो.

ह्या आंब्याला महाराष्ट् राज्यात दशेरी आंबा अणि उत्तर भारतात दशहरी आंबा ह्या नावाने ओळखले जाते.हा आंबा उत्तर भारतातील आंब्याची प्रसिद्ध अशी प्रजाती आहे.

दशेरी आंब्याचा आकार लांबट स्वरूपाचा असतो.साधारणत एक वर्षाने ह्या आंब्याच्या झाडाला फळे येत असतात.हया आंब्याची चव इतर जातीच्या आंब्यांपेक्षा अधिक गोड असते.म्हणुन ह्या आंब्याचे सेवन अधिक प्रमाणात केले जात नाही.

लंगडा आंबा –

लंगडा आंबा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंब्यांपैकी एक आहे.हया आंब्याचे उत्पादन भारतातील उत्तर प्रदेश ह्या राज्यात बनारस येथे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

लंगडा आंबा विशेषत ज्युस बनविण्यासाठी वापरला जातो.हा आंबा आकाराने गोल असतो अणि याचा बाहय भाग हिरवा असतो.

लंगडा आंबा अतिशय रसाळ अणि गोड स्वरुपाचा असतो.हा आंबा चोखुन खाता येत नाही ह्या आंब्याची साल पातळ असल्याने ही साल केळीप्रमाणे सहजरीत्या सोलता येईल अशी आहे.

आम्रपाली आंबा –

आम्रपाली आंबा हा एक हायब्रीड आंबा असतो.हा आंबा दशेरी अणि नीलम आंब्याचे मिश्रण मानला जातो.याची चव दशेरी आंब्यासारखी असते.

आम्रपाली आंबा पिवळ्या रंगाचा असतो.याचा स्वाद देखील उत्तम असतो.

बैगनपाली आंबा –

बैगनपाली आंबा संपूर्ण भारतातील अत्यंत प्रसिद्ध आंबा आहे.हा आंध्र प्रदेश मधील सर्वात प्रसिद्ध आंबा म्हणून ओळखला जातो.

मलिका आंबा –

मलिका ही देखील आंब्याची प्रसिद्ध प्रजाती आहे.हया आंब्याचा आकार खूप मोठा असतो.हा आंबा बाजारात ८०० ते ९०० ग्रॅम पर्यंत उपलब्ध होतो.

मलिका आंबा हा जुन जुलै मध्ये पावसाच्या हंगाम सुरू झाल्यानंतर येत असतो.

सुवर्णरेखा

सुवर्णरेखा ही आंब्याची एक प्रसिद्ध प्रजाती आहे.याची व्हरायटी खुप प्रसिद्ध असते.उडिसा ह्या राज्यात ह्या आंब्याचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते.

हा आंबा दिसायला एकदम छोटा असतो अणि हिरव्या रंगाचा असतो.हा आंबा चवीने खुप गोड असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button