Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? उशीर का होतोय? जाणून घ्या
कोकणात मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा हवामान विभागाकडून 11 जून रोजी करण्यात आली होती. परंतु मान्सून सध्या कोकणात आहे तो अजून पुढे सरसावला नाही.
बिपरजॉय चक्रीवादळ सध्या राजस्थान आणि पाकिस्तानच्या काही भागात आहे आणि येत्या सहा तासांमध्ये वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील मान्सूनवर झाला आहे. यावर्षी मान्सून महाराष्ट्रभर 15 जून पर्यंत पोहोचणार होता पण तो अजूनही सक्रिय झाला नाही आणि तो थांबला आहे.
मान्सून कुठे आहे नेमका?
मानसून सध्या रत्नागिरीतच थांबला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटर दिली आहे. पण अजून चांगली बातमी ही आहे सर्वांसाठी दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांमध्ये आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये 19 ते 22 जून पर्यंत व पावसाची प्रगती होणार आहे.
सध्या मान्सून हा कोकणातच रत्नागिरीमध्ये रुसून बसला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षीप्रमाणे नैऋत्य मान्सून भारतामध्ये 4 जून रोजी केरळमध्ये पोहचतो त्यानंतर तो देशभर त्याची वाटचाल करतो.
पण सध्या चक्रीवादळामुळे ही परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे अजून काही काळ आपल्या सर्वांना वाट बघावी लागेल.
मान्सून यायला उशीर होत असल्यामुळे कोकणातील शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोकणात जमीन नांगरून भाताची पेरणी केली जाते परंतु पाऊस न आल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे अनेक भागात विहिरी सुद्धा कोरडया आहेत.
त्यामुळे एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी वर्ग हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.