MPSC कट्टाPuneट्रेंडिंगनोकरी कट्टाबातम्या कट्टामहाराष्ट्रशिक्षण कट्टा
Talathi Bharti 2023 : तलाठी पदाच्या 4644 पदाची जाहिरात आली ! तलाठी वेतन, परीक्षा दिनांक, स्वरूप, फी जाणून घ्या
Talathi Bharati 2023 : राज्यात ४६४४ तलाठी पदाच्या भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही पदभरती ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून होणार असून कुठल्याही शाखेतील पदवीधराला यासाठी २६ जून ते १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
पदाचे नाव : तलाठी
विभाग : महसूल व वन विभाग, महाराष्ट्र राज्य
वेतन श्रेणी (Talathi Salary) : 25500 – 81100 रु/- (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते )
एकूण पदे : 4644
परीक्षा दिनांक :
- याबाबतची माहिती https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणेत येईल. तसेच उमेदवाराच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.
- जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in या लिंकवर उपलब्ध आहे.
Talathi Bharti महत्वाच्या तारखा :
अर्ज करणे सुरु होणे दिनांक : 26/06/2023
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 17/07/2023
शैक्षणिक अर्हता (Talathi Bharti Educational Qualification) :
- कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
- मराठी भाषा ज्ञान असणे आवश्यक.
अधिक माहितीसाठी नोटीफिकेशन जरूर वाचा.
पात्रता : भारतीय नागरिकत्व
वयोमर्यादा ( Age Limit for Talathi Bharti 2023) :
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : 17/07/2023
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा : 18- 38 वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा : 18- 43 वर्षे
- इतर प्रवर्गासाठी व अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन जरूर वाचा
तलाठी परीक्षेचे स्वरूप व कालावधी (Talathi Exam Paper Pattern ) :
- दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून ती वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे.
- एकूण गुणांच्या ४५ टक्के गुण घेणे आवश्यक राहणार आहे.
- परीक्षा एकूण 200 मार्कांची असणार आहे
- परीक्षा कालावधी : 2 तास
परीक्षा शुल्क :
खुला प्रवर्ग : 1000 रुपये/-
मागासवर्गीय व दुर्बल घटक : 900 रुपये/-
पेमेंट पद्धत : ऑनलाईन
महत्वाच्या लिंक्स :
Notification | येथे क्लीक करा |
Official Website | येथे क्लीक करा |
Apply Online | येथे क्लीक करा |
जिल्हा केंद्र निवड :-
- प्रस्तुत परीक्षेकरीता विविध जिल्हा (परीक्षा) केंद्राचा तपशील https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा योजना / पध्दती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
- अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
- जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
- जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरूपी रहिवास पत्याचे आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेशपत्र देण्यात येईल
.