Maharahstra Monsoon Update : या दिवशी येणार मान्सून ! हवामान केंद्राने दिली मान्सूनच्या आगमनाची सखोल माहिती
सध्या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी वर्ग पावसाकडे नजर लावून बसला आहे. वरूण राजाचे महाराष्ट्रातील आगमन यावर्षी खूप उशीरा होत आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मान्सूनला फटका बसला पण आज जवळपास जून महिन्यात संपत आला आहे तरीही महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला नाहीये त्यामुळे बळीराजा चिंतीत आहे.
महाराष्ट्रात शक्यतो जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयामध्ये पाऊस पडत असतो आणि शेतकरी पेरण्या करायला लागत असतो. हवामान खात्याने येणाऱ्या पुढील आठवड्यासाठी मान्सूनचं सखोल विश्लेषण दिल आहे. कोणत्या भागामध्ये मान्सूनच प्रमाण कस राहील, चला तर जाणून घेऊया पुढे वाचा ( Regional Rainfall Forecast for 22-24 June ) . पुणे येथील भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के.स. होसाळीकर यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे
महाराष्ट्रासाठी 22-24 जून पर्यंत प्रादेशिक पावसाचा अंदाज :
रंग | पावसाची शक्यता ℅ | मान्सूनची स्थिती |
गडद निळा | 76-100% | विस्तृत प्रसार |
हलका निळा | 51-75% | बऱ्यापैकी पसरलेला |
गडद हिरवा | 26-50% | बऱ्यापैकी |
हलका हिरवा | 1-25% | तुरळक |
पुढील आठवड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र व गोवा या भागांमध्ये पावसाची शक्यता जास्त वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर कोकण, पूर्व विदर्भ आणी पश्चिम विदर्भामध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
एकंदरीत बघितलं तर पुढील आठवड्यात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल अशी चिन्हे दिसत आहेत.
Jagannath Puri Rath Yatra 2023 : रथ यात्रा का काढली जाते? यात्रेचे महत्व व वेळापत्रक जाणून घ्या