Adipurush Movie Review : बहुचर्चित असलेला आदिपुरुष, पण प्रेक्षकांच्या अपेक्षेला कमी पडला
आज संपूर्ण भारतात बहुचर्चित असलेला Adipurush हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र सोशल मीडियावर तेवढीच क्रेझसुद्धा पहायला मिळाली.
रामायणाच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंह, सैफ अली खान, देवदत्त नागे, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपटात प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या संमिश्र आहेत.
साऊथ सुपरस्टार प्रभासने (Prabhas) प्रभू श्रीरामाचा रोल या चित्रपटामध्ये निभावला आहे पण वाटत होतं की प्रभास अजूनही बाहुबलीच्या भूमिकेत आहे. प्रभास या भूमिकेला न्याय देण्यात कमी पडला. या चित्रपटांमध्ये रावणाचा रोल सेफअली (Saif Ali khan) खानने निभावला असा. सैफ अली खान निभावलेली भूमिका ही चांगली आहे.त्याचप्रमाणे हनुमानाचा रोल देवदत्त नागेन ने साकारला आहे.
चित्रपटाच्या VFX वरून प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. चित्रपटाची पटकथा ही अतिशय कमजोर आहे. चित्रपट तसा तीन तासांचा आहे पण रामायणामधील महत्त्वाच्या गोष्टी या चित्रपटामध्ये बघायला मिळत नाहीत. आणि खास करून रामायणामध्ये भावना ( Emotion) आहेत पण या गोष्टी या चित्रपटामध्ये त्या कमी दिसल्या.
एकंदरीत जर बघितलात आदिपुरुष हा लोकांच्या अपेक्षाला साजेल असा उतरला नाही, चित्रपट चांगला आहे पण उत्तम नाही.
कास्ट
राघवाच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सॅनन,सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत
लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग, बजरंग म्हणून देवदत्त नागे आहे.
Youtube Monetization Update : Youtube मधून पैसे कमवने होणार सोपे, नवे बदल जाणून घ्या
Cheque Bounce Rules : खबरदार ! चेक बाउन्स कराल तर जाव लागेल तुरुंगात, वाचा सविस्तर