ट्रेंडिंगमहाराष्ट्रशेती कट्टा

Harbhara Sheti Lagwad – हरभरा पिक लागवड कशी करावी ?

Harbhara Sheti Lagwad

Harbhara Sheti Lagwad कशी करावी व त्याचे व्यवस्थापन कशे करावे जाणून घेण्यासाठी हा लेख महत्वाचा ठरू शकतो. हरभरा हे अतिशय महत्वाचे कडधान्य पिक आहे. महाराष्ट्रात शेतकरी हरभरा पिकाची लागवड करून भरगोस उत्पादन मिळवत आहेत. हरभर्‍याच्या सुधारित वाणामुळे हरभर्र्‍याच्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रातील उत्पादक भागात हरभरा या नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.

भारतात हरभऱ्याची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये केली जाते. देशातील हरभरा क्षेत्रापैकी सुमारे 90 टक्के आणि एकूण उत्पादनाच्या सुमारे 92 टक्के उत्पादन या राज्यांमधून मिळते. भारतात, 7.54 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची लागवड केली जाते, त्यातून 7.62 क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळते. उत्पादनाचे सरासरी मूल्य 5.75 दशलक्ष टन आहे.

हरभरा पिकासाठी जमीन कशी निवडावी ?

हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन हरभरा लगेयद साथी योग्य ठरते. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.तसेच जमिनीचा सामु ६.५ ते ७.५ या दरम्यान असावा.

“फुले विक्रम हरभरा” पेरणाऱ्या शेतकऱ्यांनि हे नक्की वाचा

(Harbhara Sheti Lagwad) पूर्वमशागत कशी करावी ?

खरीपाचे पीक निघाल्यानंतर जमिनीची खोल नांगरट करावी. तसेच कुळवाच्या दोन पाळया द्याव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ व नीटनेटकी करावी. खरीपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. अशाप्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.

पेरणीची वेळ (Harbhara Sheti Lagwad) ;

हिवाळ्याचे दिवस चालू झाले की लगेच घाई चालू होते ती हरभरा लागवडीची. हरभरा हे रब्बी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. महराष्ट्रामध्ये सेप्टेंबर च्या अखेरीस लागवड ची तयारी चालू केली जाते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची सोय अजिबात नसेल तेथे सप्टेंबरनंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण वापरावेत. बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान पेरल्यास उत्तम प्रकारचे उत्पादन येते. पेरणीची वेळ फार लांबल्यास किंवा डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पन्न फार कमी मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.

पेरणीची पध्दत ;

२ रोपातील अंतर किमान १० सेमी असावे तसेच २ ओळी तिल अंतर किमान ३० सेमी असावे.

कीटक नियंत्रण:

  • कटुआ : हे कीटक हरभरा पिकाचे अतोनात नुकसान करते. हे टाळण्यासाठी 20 किलो/हे. क्‍लोरपायरीफॉस प्रतिकिलो याप्रमाणे जमिनीत मिसळावे.
  • शेंगा बोअरर: शेंगामध्ये दाणे तयार होण्याच्या वेळी शेंगा बोअरर च प्रादुर्भाव जास्त असतो.नियंत्रित न केल्यास उत्पादनात ७५ टक्के घट येते. हे टाळण्यासाठी मोनॅक्रोटोफॉस 40 ईसी 1 लिटर या प्रमाणात 600-800 लिटरमध्ये टाका. ते पाण्यात मिसळून अंकुर येण्याच्या वेळी पिकावर फवारावे.

बीजप्रक्रिया:

बियाण्यास थिरम 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि योग्य रायझोबियम कल्चरची प्रक्रिया करणे आवश्यक आहे….

सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अधिक माहिती साठी इथे क्लिक करा.

हरभरा शेतीशी निगडीत काही प्रश्न

1.हरभरा पीक किती दिवसात येते?

harbhara साधारणतः 130-135 दिवसांत पिकते. त्याचे सरासरी उत्पादन 9 क्विंटल प्रति एकर आहे. पुसा चामटकर : ही चण्याची विविधता आहे. ही जात साधारण 140-150 दिवसांत पिकते.

2. सर्वाधिक उत्पादन देणारा हरभरा कोणता?

हरभरा (दिग्विजय) फुले 9425-5 वाण राहुरी येथील फुले कृषी विद्यापीठाने हरभरा ही जात विकसित केली आहे. या जातीचा उच्च उत्पादन करणाऱ्या वाणांमध्ये समावेश होतो.

3.हरभरा पिकाला युरिया कधी द्यावा?

पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर तुम्ही ते देऊ शकता, तुम्हाला ते एकदाच द्यावे लागेल.

4.भारतात हरभरा कुठे पिकतो?

मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि पंजाब ही भारतातील प्रमुख हरभरा उत्पादक राज्ये आहेत.

5.हरभऱ्यासाठी कोणते खत चांगले आहे?

पेरणीपूर्वी 30 दिवस आधी सेंद्रिय खत दिले जाते. 50% फुलल्यानंतर द्रव सेंद्रिय खत, पंचगव्य 3%, वर्मीवॉश 10%, गोमूत्र 10% वापरतात. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे मातीची पोषकतत्वे वाढते आणि जमिनीची भौतिक व जैविक स्थिती सुधारते.

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button