ठीक 7 वर्षानांनतर पुन्हा नोटबंदी ? 2000 रुपयाची नोट बंद ? वाचा सविस्तर
पुन्हा नोटबंदी…हो आपण बरोबर वाचलात. 2016 मधील नोटबंदीच्या जुन्या आठवणी संपत नाहीत तोवर सरकारने 2 हजाराच्या नोटाचा बंदीचा निर्णय घेतला आहे.
RBI ने जी माहिती जाहीर केली आहे त्यात नमूद केल आहे की, 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे.जनतेला 30 सप्टेंबरपर्यंत नोट बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. म्हणजे ज्या कोणाकडे 2 हजाराच्या नोट असतील ते बँक जाऊन जमा करू शकतात.
एकंदरीत पाहता सरकारने हा निर्णय का घेतला असावा याची अजून पूर्णपणे स्पष्टोक्ती आली नाही.
पुढे काय? समजून घ्या…
1) नोटांचे काय करावे?
30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजार रुपयांचे नोट बँकेत जमा करावे व त्या इतर चलनी नोटांमध्ये बदलून घेता येतील
2) नोटा कधीपासून बदलून मिळतील?
जनतेला 23 मे 2023 पासून नोटा बँकांमध्ये बदलून मिळण्यास सुरुवात होईल. ही प्रक्रिया 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरु राहील.
3) किती नोटा एकाच वेळी बदलता येतील?
सध्या एकाच वेळी 20 हजार रुपयांंची मर्यादा आहे, म्हणजे एकाच वेळी तुम्ही 10 नोटा बँकामध्ये जमा करू शकाल. बँक खात्यात जर 2000 च्या नोटा स्वरूपात रक्कम जमा करायची असेल तर त्यावर कोणतीही मर्यादा नाही
4) 20 हजार रुपायाची मर्यादा का?
बँकांचे कामकाज नियमित सुरु राहावे व त्यात कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून ही आत घालण्यात आली आहे.
5) नोट लीगल टेंडर म्हणून राहणार आहे म्हणजे?
लीगल टेंडर म्हणजे 2000 रुपयाची नोट ही वैध चलन म्हणून कायम राहणार आहे.
मागील काळात नोट बँकात जमा करण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळेस नोटबंदीवर जोरदार टिका देखील झाली होती.
आता 2 हजाराच्या नोट बंद म्हंटल की पुन्हा बँकेत जाण आल व मुदतीपूर्वी रक्कम दुसऱ्या चलनात घेऊन येण आल. असो तसा कालावधी 4 महिन्याचा देण्यात आला आहे, तो पर्यंत सुरळीत ही प्रक्रिया पार पडेल ही आशा आहे.