Maharashtra Mansoon Update : मान्सूनचा जोर वाढला! हवामान खात्याने दिल्या महत्वाच्या सूचना, वाचा सविस्तर
Maharashtra Mansoon Update : राज्यात मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे. मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. काल जर आपण बघितलं तर नागपूर, रायगड, मुंबई व मध्य महाराष्ट्र या ठिकाणी चांगला पाऊस झाला.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे ( Biparjoy Cyclone ) लांबलेला पाऊस आता सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस हे राज्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. मान्सून (Maharashtra Mansoon Update) आपला जोर वाढवणार आहे. तसेच काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
आज सकाळपासून मुंबईत पावसाने (Mumbai Rains) जोर पकडला आहे. मुंबई व पुणे मध्ये आज पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील काही भागात काल कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या.
मुंबई हवामान विभागाने काय सूचना दिल्या आहेत?
- राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता.
- हवामान विभागातर्फे सूचना जारी करण्यात आल्या आहेत
- कोकणात व विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अती मुसऴधार.
- पुणे सातारा नाशिक ही मुसऴधार ते अती मुसऴधार.
- मराठवाडा मध्ये ही पावसाचा जोर राहील.
बळीराजाची चिंता कधी मिटणार? (Maharashtra Mansoon Update)
बळीराजा पुढे सर्वात मोठा प्रश्न आहे तो पेरणीचा. जून महिना संपत आला आहे तरीही मुबलक असा पाऊस नाही. याकारणाने बळीराजा चिंतेत सापडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येणारा आठवडा हा महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून पोहचवणारा असेल असा अंदाज आहे.
विहिरीत अडकलेल्या बिबट्याचं खतरनाक रेस्क्यू! आग लावली, शिडी टाकली, Video पाहून नेटकरी संतापले