MPSC कडून आनंदाची बातमी : पदांच्या संख्येत केली वाढ ! जाणून घ्या सविस्तर
एमपीएससी कडून 11 मे 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिराती मध्ये केवळ 161 पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती होती. याकारणास्तव विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती.
पण आज अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी ‘गट-अ’ आणि ‘गट-ब’ संवर्गातील 340 पदे वाढविण्यात आली आहेत. या वाढवलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक पदे देखील आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी लाखो विद्यार्थी या एमपीएससी परीक्षेसाठी तयारी करतात. विशेषत पुण्यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
एकुण जागा
गट ‘अ’
उपजिल्हाधिकारी – 33
पोलिस उपअधीक्षक – 41
सहायक राज्यकर आयुक्त -47
उपमुख्य कार्यकारी अधिकारी – 14
उपनिबंधक,सहकारी संस्था – 2
शिक्षणाधिकारी – 20
प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) – 6
तहसीलदार – 25
गट ‘ब’
सहायक गटविकास अधिकारी – 80
उपअधीक्षक, भूमी अभिलेख – 3
सहायक निबंधक, सहकारी संस्था – 2
उपशिक्षणाधिकारी – 25
सहायक प्रकल्प अधिकारी – 42
एकूण – 340
तलाठी भरती २०२३ : महाराष्ट्र महसूल व वन विभाग तलाठी फॉर्म !
पुण्यातील ‘या’ स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या, धनंजय मुंडे यांची मागणी