जागतिक कट्टाटेकनॉलॉजि कट्टा

खूपच छान! गुजरात मधील तरुण शेतकऱ्याने बनविला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर,

खूपच छान! गुजरात मधील तरुण शेतकऱ्याने बनविला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर, एकदा चार्ज केल्यावर चालतो दहा तास (ElectricTractor)

(ElectricTractor)शेतीमध्ये आता विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. अगदी शेतीच्या पूर्वमशागतीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंत यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.काढण्यासाठी विविध प्रकारचे हार्वेस्टर, फवारणीसाठी विविध प्रकारचे स्प्रेयर पंप कधी मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये वापरले जात आहेत. या सगळ्या यंत्रांमध्ये शेतीची पूर्व मशागत करण्याचे महत्त्वाचे काम आता ट्रॅक्टरद्वारे पार पाडले जाते. बैलांच्या साह्याने होणारे शेतीचे काम आता कालानुरूप मागे पडत आहेत. बैलासारखा ट्रॅक्टर आत्ता शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मित्र झाला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. (ElectricTractor)

electrictractor
electrictractor

परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेल इंधनाच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचा वापर शेतात करणे खूप खर्चिक झाले आहे. या दरवाढीचा फटका हा ट्रॅक्टर लाच नाही तर इतर वाहनांना देखील बसला आहे. त्यामुळे अनेक इलेक्ट्रिक वाहनेबाजारात उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवरचपेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्याप्रसंगी एक दिलासादायक बातमीसमोर आली आहे. ती म्हणजे गुजरात मधील एका तरुण शेतकऱ्यानेचक्क (ElectricTractor) बॅटरीवर ऑपरेट होणारा ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवला असून तो सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेचा विषय बनला आहे.

हे पण वाचा>मोठी बातमी! SBI बँक आपल्या ग्राहकांना देत आहे खास स्कीम जाणुन घ्या (SBI BNK)

गुजरात मधील तरुणाने बनवला बॅटरीवर चालणारा ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ (ElectricTractor)

‘न्यूज 18’ च्या वृत्तानुसार गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील कलावाड तालुक्यातील पिप्पर या गावात राहणाऱ्या महेश नावाच्या तरुण शेतकऱ्यांनी हा बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर बनवला असून या ट्रॅक्टरला त्याने व्योम हे नाव दिले आहे. जर महेशच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार केला तर महेशचे वडील शेती करतात व महेश हा सुद्धा त्यांच्या वडिलांना शेतीमध्ये मदत करतो. त्यामुळे त्याला शेतीची ही सगळी परिस्थिती माहित आहे. इंधन दरवाढीच्या दरम्यान हा ट्रॅक्टर खूप दिलासादायक ठरू शकतो. (ElectricTractor)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!