ट्रेण्डिंग

(story) एप्रिल ते जून

एप्रिल ते जून

आज इरफान खान गेला, वयाची 54 संपवून. सगळेजण स्टेटस ठेऊ लागले की असा अभिनेता होणे नाही, खूपच लवकर गेला, डायमंड, अन बरच काही विशेषण जी मला समजली नाहीत. शाळेतल्या ग्रुप वर पण एकाने मेसेज टाकला, रेस्ट इन पीस इरफान. अन माझ्या रिप्लाय एका डिस्कशन चालू झाला, मी असा रिप्लाय दिला की “मला काही वाटत नाही असलं ऐकल्यास, मन अगदी निष्ठुर झालाय” खरतर मला सांगायचं वेगळं होत पण दोघा तिघांनी उलट घेतलं अन एकदोघांनी सुलट. (story)

अरे जिथं जन्मलेल्या व्यक्तीचा सोहळा नाही तिथं मेलेल्यांबद्दल दुःख का??? इरफानसाहेबांनी खूप आयुष्य जगल आहे , चोपन्न वर्षे तुम्हा लोकांना कमी वाटत आहेत का?? तरी ही लोक म्हणतायेत की लवकर गेला, खूपच धक्कादायक बातमी, हर्ट ब्रेकिंग. अर्रे देवा कसा करावा समजत नाही. माझ्या आयुष्याची सत्तावीस वर्षे संपली आहेत अन यदा कदाचित मी मृत्यूच्या दारात पोहचलो तर वळून पाहताना कदापि दुःख होणार नाही कारण मी जगलोय ही सत्तावीस वर्षे.(story)

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

एक गोष्ट आहे जी खूपच मनाला लागली आहे, अन बहुतेक माझ्या मित्रांना ही सांगितली पण आहे. मी पीजी करत असताना, मनुफॅकच्युरिंग(मेकॅनिकल) चा माझ्या मित्राचा एक मित्र होता, घरातला एकुलता एक, एप्रिल महिन्यात त्याला पाठीत वा कुठंतरी दुखतंय म्हणून दवाखान्यात गेला, तिथल्या डॉक्टर ने त्याला पुण्याला संचेती मध्ये जायला सांगितलं अन तिथं गेल्यास समजला की त्याला कॅन्सर झाला आहे, अन तोही तिसऱ्या टप्प्यातला.विचार करा मोजून अडीच तीन महिन्यांत आमच्या सोबत क्रिकेट खेळणारा, लेक्चर अटेंड करणारा दोस्त अचानक कसा मृत्यूच्या दारात पोहचला.डॉक्टर सांगायचे की त्याची हाडे इतकी ठिसूळ झालीत की इस्त्रीच्या आकाराचा शॉक पण द्यायला जमायचा नाही, सलग दोन महिने तो पलंगावर झोपून होता. शेवटच्या दिवसांत त्यानं बोललेल्या एका वाक्याने जीवनाचा अर्थच समजून गेला असा म्हटलं तरी वावग ठरायच नाही, ते वाक्य होता,”डॉक्टर, माझी एक शेवटची इच्छा आहे, मला फक्त त्या दरवाज्यापर्यंत चालत जाऊन यायचं आहे”(story)

गौरवा#

धन्यवाद

Date_29/04/2020

Insurance भारतात जीवन विमा पॉलिसीचे प्रकार

CLICK HERE

👉🏻योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा👇🏻

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना:   

           CLICK HERE 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!