ट्रेण्डिंग

SBI ची भन्नाट योजना!! शेतकऱ्यांना ‘या’साठी मिळणार कर्ज; असा करा अर्ज…….

(Agricultural Country) भारत कृषिप्रधान देशआहे देशाची जीडीपी ही शेती क्षेत्रावर (Agriculture Sector) अधिक अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांना शेतीमधून अधिक उत्पादन प्राप्त करता यावे यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना (Government Scheme) कार्यान्वित केल्या जातात. sbi


सरकार, बँक, प्रायव्हेट कंपनी वेगवेगळ्या संस्था शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या योजना ( Farmers Scheme) आणत असतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) देखील शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी ट्रॅक्टर अत्यंत उपयोगी साधन आहे. या आधुनिक युगात ट्रॅक्टर विना शेती करणे जवळपास अशक्यच आहे. अगदी पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत सर्व ठिकाणी ट्रॅक्टरची नितांत आवश्यकता असते. sbi

हे पण वाचा: What is Computer..? कंप्यूटर्सचे प्रकार

असे असले तरी, प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करणे अशक्य आहे. sbi

पैशांची पुरेशी उपलब्धता होत नसल्याने अनेक शेतकरी बांधव ट्रॅक्टर खरेदी पासून वंचित राहतात. परिणामी त्यांना भाडे तत्वावर ट्रॅक्टर लावावे लागते आणि आपल्या मशागतीची तसेच काढणीची कामे करावी लागतात. यामुळे शेतकरी बांधवांचा अधिकचा वेळ खर्च होत असतो शिवाय पैसा देखील अधिकचा खर्च होतो. sbi


स्टेट बँक ऑफ इंडियाने आता शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल मात्र पुरेशी रक्कम उपलब्ध नसेल त्या शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण की, देशातील सर्वात मोठी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने एक योजना अमलात आणली आहे, यामुळे शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदी साठी कर्ज (Loan for the purchase of tractor) उपलब्ध करून दिले जाणार आहे फक्त कर्ज उपलब्ध होणार असे नाही तर बँक अनुदान देखील देणार आहे मात्र यासाठी काही निकषघालून दिले आहेत.मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एसबीआयच्या ग्राहकांसाठी एसबीआय ने एक योजना आणली आहे. ही योजना एसबीआयने ट्रॅक्टर खरेदी साठी आणली आहे. याद्वारे ट्रॅक्टर घेण्यासाठी झटपट लोन दिले जाते.

यामध्ये ट्रॅक्टरची 100% किंमत विमा आणि नोंदणी शुल्क सुद्धा कर्ज म्हणून घेता येते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी चार ते पाच वर्षाचा कालावधी बँकेकडून दिला जातो. जे अत्यल्पअल्पभूधारक शेतकरी आहेत अर्थात ज्या शेतकऱ्यांकडे दोन एकर पेक्षा कमी शेतजमीन आहे ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना डीलरद्वारे sbi

 हे पण वाचा: Youtube पर सबसे ज्यादा पैसा कौन कमाता है..? Youtube से भारत मे लोग कितना पैसा कमाते है ।

ट्रॅक्टर कोटेशन, लागवडीचा पुरावा, 6 पोस्ट डेटेड चेक sbi

(PDC) / ECS, ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड,

ड्रायव्हिंग लायसन्स इ. कागदपत्रांची बँकेत पूर्तता करावी

लागणार आहे. यामुळे निश्चितच अल्पभूधारक शेतकऱ्यांना

फायदा होणार असून शेती क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे. sbi

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!