ट्रेण्डिंग

SBI बँकेची ऑफर नेमकी आहे तरी काय

सर्वात मोठी बँक म्हणुन ओळखली जाणारी SBI ने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी एक खास ऑफर आपल्या ग्राहकांसाठी सुरु केली आहे. ज्या अंतर्गत स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी ग्राहकांना दिली जातं आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले आहे की, या अक्षय्य तृतीयेला ग्राहकांना दागिन्यांवर उत्तम ऑफर मिळत आहेत, ज्याचा खातेदार लाभ घेऊ शकतात.

या ऑफर च्या माध्यमातून SBI खातेधारकांना अँपद्वारे शुल्कवर 100% सूट मिळू शकते. डायमंड ज्वेलरी बनवण्यासाठी शुल्कावर ग्राहकांना 100 सूट मिळू शकते. याशिवाय, सोन्याच्या दागिन्यांवर ग्राहकांना 25% सूट मिळु शकणार आहे. याशिवाय जर ग्राहकांनी प्लॅटिनमचे दागिने खरेदी केले तर त्यांना त्याच्या मेकिंग चार्जेसवर 30 टक्के सूट मिळेल. चांदीच्या दागिन्यांवर देखील मेकिंग शुल्कावर 20% सूट दिली जाणार आहे.
याशिवाय 1,50,000 किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर बँक ग्राहकांना 1 ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत देणार आहे. याशिवाय SBI क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 5 टक्के अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. या ऑफरचा लाभ 26 एप्रिल 2022 ते 8 मे 2022 पर्यंत दिला जाणार आहे. बँकेच्या या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर ही ऑफर 8 मे 2022 पर्यंत सुरू राहणार आहे याची नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!