ट्रेण्डिंगशेती कट्टा

(Rains) राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच – पहा कशी असेल पुढील स्थिती

(Rains) राज्यात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असूल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे – जुलै महिन्यात 15 दिवसांत 392.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे(Heavy rains continue to wreak havoc in the state – see what the next situation will be)

तसेच मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्याना पूर आल्याने 104 नागरीकांना आपला जीव गमवावा लागला

पहा कशी असेल पुढील स्थिती ?

● राज्यात 20 जुलैपर्यंत कोकण आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

● तर याच काळात हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत जोरदार वारे आणि वादळी वारे वाहतील, असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे

● याव्यातिरिक्त राजधानी मुंबईत पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे

ही पण बातमी वाचा

नवोदय विद्यालयाच्या आस्थापनेच्या विविध पदांच्या १६१६ जागा

वर्ध्यात मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतरचे काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे नद्या, नाल्यांना पुर आले. तर काही धरणेही भरली. तसेच राज्यात झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता राज्यात पावसाचा जोर ३-४ दिवस कायम राहाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीही कायम आहे.(Rains)

👉वर्ध्यात मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

👇👇👇👇


वर्ध्यात मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे (Schools, Colleges to be closed Today in Wardha due to Flood Situation). जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नागरिकांनाही कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन केलं गेलं (Rains)

4, 5 दिवस पावसाचा जोर कायम

राज्यातील पावसाची परिस्थिती कशी राहणार, याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढील 4, 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच येत्या ३ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

ही पण बातमी वाचा

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?

राज्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने धुमशान घातले आहे. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 104 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 189 प्राणी दगावले आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. (Rains)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!