टेकनॉलॉजि कट्टाट्रेण्डिंगशिक्षण कट्टाशेती कट्टा

(Panjabrao Dakh) पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? या विषयी पंजाबराव डख यांनी सांगितली महत्त्वाची माहिती…

परंतु १९९५ नंतर उद्योगधंदे वाढले, मोठी शहरे वसली यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने निसर्गाने रौद्र रूप धारण केले. सध्या पृथ्वीवरील तापमान वाढल्याने पावसाचे प्रमाण देखील वाढले असल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले.(Panjabrao Dakh)
तेव्हा कुठे तुम्हाला हे ठामपणे सांगू शकतो. काळजी करू नका, १५ दिवस आधीच मी तुम्हांला पावसाची माहिती देत राहील अन् तुमचे नुकसान होऊ देणार नाही.

काय आहेत निसर्गाचे संकेत(Panjabrao Dakh)

• घरातील लाईट, बल्ब, ट्युब भोवती किडे, पाकुळ्या आल्यातर समजावे पुढील ७२ तासांत पाऊस पडणार आहे.

• वारा बंद होणे, सरपटणारे प्राणी बिळातून बाहेर पडू लागले, गर्मी जास्त जाणवू लागली तर समजावे पाऊस पडणार आहे.

• पावसाळ्यात दिवस मावळत असताना, पश्चिमेस सायंकाळच्या वेळेला आकाश लालसर, तांबडे दिसले तर जुने लोक बी पडलं असे म्हणायचे. अशावेळी ७२ तासांत पाऊस पडणार समजावे.(Panjabrao Dakh)

• चिमण्यांनी घरासमोरील अंगणातील धुळमातीत आंघोळ केल्यास ७२ तासांत पाऊस पडणार समजावे.

• हवेतून उडणाऱ्या विमानाचा आवाज आला तर पाऊस पडणार असल्याचे समजते. ऐरवी विमानाचा आवाज ऐकू येत नाही.
• गावाच्या बाजूला ४ ते ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील काकडा आरती, भजन याचा आवाज ऐकू आला तर पाऊस पडतो.

• सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सकाळी आपण शेतात गेल्यास पाय ओले झाले, दव पडलेले असले व पत्र्यावरून अंगणात पाणी पडले तर त्यादिवशी पाऊस पडत नाही. ज्यादिवशी दव पडणार नाही त्यावेळी पाऊस होतो.

• ज्यावर्षी गावरान आंबा जास्त पिकतो, आपण खुप रस खातो. त्यावर्षी दुष्काळ पडतो, असे समजावे.

• मुंग्यांनी आपले वारूळ जास्त उंच तयार केले असेल तर त्यावर्षी पाऊस जास्त पडतो.

• वावटळ, वाळुट सुटल्यावर ७२ तासांत पाऊस पडणार

समजावे.(Punjabrao Dak)

• हवेत उडणारे घोडे (किटक) ज्यावर्षी जास्त दिसतील त्यावर्षी ‘अतिवृष्टी’ होणार असे समजावे.

• दमा असणाऱ्या व्यक्तींना त्रास जाणवू लागला तर पाऊस पडतो. कारण वातावरणात बाष्प जास्त होऊन ऑक्सीजन कमी होत असतो.
सूर्याभोवती ११ जुनला दुपारी १२ वाजता गोल रिंगण, खळे दिसले की दुष्काळ पडतो.(Panjabrao Dakh)

• १५ मे ३० मे या कालावधीत ज्या गावात पाऊस पडतो, त्या गावात येणाऱ्या पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो. मात्र या कालावधीत ज्या गावात पाऊस पडत नाही. त्या गावात येणाऱ्या पावसाळ्यात पाऊस लांबतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!