ट्रेण्डिंगशेती कट्टा

pm kisan e kyc करण्यासाठी मुदतवाढ पण; ई-केवायसी केलेली नसेल तर मिळेल का 11वा हफ्ता ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी e-KYC केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरं पाहता केवायसी करण्यासाठी या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत केवायसी करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला होता. pm kisan e kyc

मात्र तांत्रिक अडचणींमुळे योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना e-KYC केवायसी करता येत नव्हती म्हणून सरकारने 31 मे 2022 पर्यंत केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र असे असले तरी आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केवायसी झालेली नसतानादेखील या योजनेचा अकरावा हफ्ता मिळू शकतो का? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारण की केवायसी करण्यासाठी फक्त मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र केवायसी करणे अजूनही बंधनकारक आहे. यामुळे आज आपण ज्या शेतकऱ्यांची अद्याप केवायसी झालेली नाही त्यांना या योजनेचा पुढचा हफ्ता मिळेल का याविषयी जाणून घेणार आहोत. pm kisan e kyc

हे पण वाचा >(Dam)धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

e-KYC मित्राना आम्हा आपल्या माहितासाठी सांगू इच्छिता का,

पीएम किसान सम्मान निधि योजना या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा देशभरातील सुमारे 12 कोटी शेतकरी लाभ उचलत आहेत. या योजनेंतर्गत, प्रत्येक आर्थिक वर्षात, मोदी सरकार शेतकऱ्यांना 2000-2000 रुपयाच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. याअंतर्गत दरवर्षी पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च या कालावधीत येतो. म्हणजेच या आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता अर्थात दहावा हफ्ता होळीपूर्वी आणि 11वा हप्ता येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती मात्र ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू झाली

हे पण वाचा >   Youtube पर सबसे ज्यादा पैसा कौन कमाता है..? Youtube से भारत मे लोग कितना पैसा कमाते है ।

येत्या काही दिवसात अकरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार असल्याने. ज्या शेतकऱ्यांनी अजून e-KYC केवायसी केलेली नाही त्यांना या योजनेचा पुढचा हप्ता मिळतो का हा मोठा प्रश्न आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मागील हफ्त्याप्रमाणेच हा पुढचा हप्ता अर्थात 11वा हफ्ता केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांना देखील दिला जाऊ शकतो. जाणकार लोकांच्या मते, केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली असल्याने 11वा हफ्ता केवायसी केली नसेल तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो. याबाबत अजून कुठलेही अधिकारिक वक्तव्य समोर आलेले नाही. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, e-KYC केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना देखील 11वा हप्ता मिळणार आहे. pm kisan e kyc

हे पण वाचा: What is Computer..? कंप्यूटर्सचे प्रकार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!