ट्रेण्डिंग

Panjabrao Dakh: महाराष्ट्राचा हवामान अंदाज पहा पंजाबराव डक काय म्हणतात.

परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्राही त्राही करून सोडले असून शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. अगोदरच जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अपरिमित नुकसान झाले व जे काही पिके वाचले त्यांचे काढणीचे काम आत्ताच जोरात सुरू असतानाच परतीच्या पावसाने महाराष्ट्रामध्ये परत एकदा धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी बंधूंच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यातल्या त्यात एवढे करून देखील आता तरी मान्सूनचा पाऊस परतीचा मार्ग धरेल असे दिसत असतानाच परत सगळीकडे महाराष्ट्रात पाऊस सुरू असून दिवाळीसारखा सण सुद्धा पावसात जाईल की काय अशी भीती निर्माण होत आहे.

त्यातल्या त्यात आपण हवामान खात्याचा अंदाजाचा विचार केला तर अजून तरी एक आठवडाभर परतीच्या पावसाचा मुक्काम राहणार असून आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

त्यासोबतच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याची तीव्रता वाढत आहे. हा कमी दाबाचा पट्टा तयार क्षेत्रापासून तामिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्र पर्यंत सक्रिय असून त्यामुळे पुढचे दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

पंजाबरावांचा हवामान अंदाज

शेतकऱ्यांमध्ये हवामानाच्या बाबतीत विश्‍वासाचे स्थान निर्माण केलेले पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाचा विचार केला तर आज पासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाची उघडीप राहणार आहे. पीक काढण्याचे काम सुरू असताना आता शेती कामांना वेग येणार असून दिवाळीच्या सणाला देखील आता एक वेगळीच मजा निर्माण होणार आहे. परतीच्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून घातलेला धुमाकूळ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पिकांची नासाडी झाली आहे.

परंतु जर पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाचा विचार केला तर आजपासून पावसाची उघडीप राहणार असून थंडीचा जोर वाढणार आहे. त्यामुळे पंजाब रावांच्या या अंदाजामुळे आता शेतकरी बंधूंना नक्कीच दिलासा मिळणार असून शेती कामाला देखील आता वेग येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!