ट्रेण्डिंग

नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूषखबर !

नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूषखबर ! प्रोत्साहनपर 50 हजाराचे अनुदान देण्याची प्राथमिक अंमलबजावणी सुरू(Mahatma Phule Debt Waiver Scheme)

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर महात्मा फुले कर्ज माफी योजना जाहीर केली होती. या कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी नियमित पिक कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करण्यात आली होती.(Mahatma Phule Debt Waiver Scheme)

परंतु (Mahatma Phule Debt Waiver Scheme)महात्मा फुले कर्ज माफी ची अंमलबजावणी करण्यात आली मात्र जे शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान अद्यापपर्यंत देण्यात आले नव्हते. मध्यंतरी कोरोना महामारी आल्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्याने अनुदानाची योजना रखडली होती. त्यानंतर 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये राज्य शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या वीस लाख शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची तरतूद यामध्ये केली होती. परंतु या गोष्टीला 3 महिने उलटून गेल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता सहकार आयुक्तांनी जिल्हा आणि तालुका निबंधकांना जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करून पाठवण्याचे आदेश काढले आहेत.(Mahatma Phule Debt Waiver Scheme)

यामध्ये सन 2017 ते 2020 यामध्ये पिक कर्ज आणि परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची माहिती आठ दिवसात मागवली आहे. त्यामध्ये विकास सेवा सोसायटी, जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून सदरची माहिती पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. राज्य सरकारने प्रोत्साहन अनुदान योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेला गती दिली असून काही तज्ञांच्या मते जिल्हा परिषद निवडणूक याअगोदर जुन अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सदर अनुदान शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. सहकार आयुक्तांनी जिल्हा आणि तालुका निबंधकांना 2017 ते 20 या वर्षात कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करून(Mahatma Phule Debt Waiver Scheme)

पाठवण्याचे अध्यादेश काढला आहे.त्यामुळे नियमित कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन मिळण्याच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!