ट्रेण्डिंग

Mahabaleshwar tourism places महाबळेश्वर मधील ३४ प्रसिध्द पर्यटन स्थळे |

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे.महाबळेश्वरला जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनच संबोधले जात होते. येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उदयाने, श्वास रोखायला लावणारी दृश्ये इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात.(Mahabaleshwar tourism places)

(mahadbt) पाईपलाईन 90% अनुदान योजना

👉🏻अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

ब्रिटीश-कालीन वैभवसंपन्न आणि मनमोहक वाडे, इमारती या आजही त्यावेळच्या ब्रिटीश राजवटीची ओळख करून देतात. मार्च ते जून हा कालावधी महाबळेश्वरला भेट देण्यास योग्य आहे.

येथील प्रेक्षणीय ठिकाणांना ‘पॉईंट’ म्हणतात. बहुतांशी ‘पॉईंट’ हे डोंगराच्या टोकालाच आहेत.

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एक लहान नगरपरिषदचे शहर आहे. येथे अनेक हे हिंदू देवतांची प्राचीन मंदिरे असून येथे कृष्णा नदीचा उगमस्थान आहे. तसेच याला तीर्थक्षेत्र असेही म्हणतात. ब्रिटीश वसाहत राज्यकर्त्यांनी हे शहर थंड हवेचे (हिल स्टेशन Hill Station) ठिकाण म्हणून विकसित केले आणि ब्रिटीश राजवटीच्या  काळात बॉम्बे प्रेसिडेंसीची उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केले.

जुने महाबळेश्वर आणि नवीन महाबळेश्वरमध्ये विभागलेले आहे, नवीन महाबळेश्वरमध्ये बरीच मनमोहक पर्यटन स्थळे आहेत (New Mahabaleshwar has many attractive tourist Places), जसे की विलसन पॉईंट्स, मुंबई पॉइंट, आर्थर सीट, बॅबिंग्टन पॉईंट, चायनामन धबधबा, एलिफन्टस हेड पॉईंट, मेण संग्रहालय, मॅप्रो गार्डन, धोबी वॉटरफॉल, फॉकलँड पॉइंट, वेण्णा लेक, हेलेन्जआर लेणी आणि इतर आकर्षणे.(Mahabaleshwar tourism places)

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर


जुने महाबळेश्वर हे  ऐतिहासिक ठिकाण आणि  हिल स्टेशन (Old Mahabaleshwar is a historical place and hill station) आहे जे पश्चिम घाटांच्या श्रेणीत येते. जुन्या महाबळेश्वरला “क्षेत्र महाबळेश्वर” म्हणून देखील ओळखले जाते. जुना महाबळेश्वर नवीन महाबळेश्वरपासून सुमारे ७ किमी अंतरावर आहे. या पवित्र ठिकाणी पंचगंगा मंदिर, महाबळेश्वर मंदिर आणि  कृष्णाबाई मंदिर अशी तीन मंदिरे आहेत.

महाबळेश्वर : फिरण्यासाठी जायचा विचार करताय तर उत्तम पर्याय

क्षेत्र महाबळेश्वर

हे एक सर्वात प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्या उगम पावल्या आहेत. या मंदिरामुळेच याला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. या प्राचीन मंदिराला तुम्ही नक्की भेट देऊ शकता.

२. प्रतापगड

महाबळेश्वर पासून २० किमी अंतरावर प्रतापगड आहे. प्रतापगडावर कडेलोट पॉईंट आहे. गडावरुन पश्चिमेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध झाला. गडावर तुळजाभवानीचे मंदिर आणि शिवछत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा आहे.

३. विल्सन पॉईंट

महाबळेश्वर मधील उंच पॉईंट असलेला विल्सन पॉईंट वरुन दक्षिणेकडे पोलोग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोर्‍याचा आसमंत दिसतो. दुसर्‍या बुरुजावर सुर्योदय पाहता येतो. तर तिसर्‍या बुरुजावरुन उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉईंट, कॅनॉट पॉईंट, खालचे रांजणवाडी गाव आणि वेण्णा नदीचे खोरे दिसते. (Mahabaleshwar tourism places)

४. तापोला

तापोला याला महाराष्ट्राचे मिनीकाश्मीर म्हणतात. नौका विहारासाठी येथे लोकं येतात. हा देखील एक सुंदर पॉईंट आहे. ज्याला तुम्ही भेट देऊ शकता.

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

५. वेण्णा तलाव

पर्यटकांना येथे नौका चालवण्याचा आनंद घेता येतो. या ठिकाणी बाजुला घोडेस्वारी देखील करता येते. तलावाच्या मागे घनदाट अरण्य आकर्षित करतो.

६. टेबललँड

पर्यटकांमध्ये टेबललँडचे विशेष आकर्षण आहे. येथे घोडा गाडीवर बसून संपूर्ण मैदानाचा फेर फटका मारता येतो. येथे २ गुहा आहेत. ज्या पाहण्यासाठी लोकं नक्की जातात. गुहेत असलेले शिवमंदिर आणि लायन गुहा येथे पाहता येते.

७. मालाज फुड मार्केट

भोसे येथे मालाज फुड प्रॉडक्ट कंपनी आहे. येथे विविध फळांचे जाम, जेली मार्मालेडस्, क्रशेस आणि सिरपचे उत्पादन केले जाते.

८. मॅप्रो गार्डन

या ठिकाणी तुम्हाला विविध फ्लेवरच्या आईस्क्रीम खायला मिळतात. पिज्जा तसेच अनेक गोष्टी येथे मिळतात. सोबतच तुम्ही येथे चॉकलेट, सिरप, जाम आणि इतर गोष्टींची खरेदी करु शकता.

९. शिवकालीन खेडेगाव

या ठिकाणी तुम्ही शिवकालीन खेडेगाव कसे होते. हे पाहू शकता. य ठिकाणी तुम्हा फोटोग्राफी करण्याचा आनंद मिळू शकतो. या ठिकाणी सध्या १०० रुपये प्रतिव्यक्ती शुल्क आकारला जातो.

हे पण वाचा : 👉🏻 महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2021: पंजीकरण, पात्रता, लंबे उद्देश्य।! विधवाओं महाराष्ट्र के लिए योजना।

 👉🏻महाराष्ट्र विधवा पेंशन योजना Registration करण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!