ट्रेण्डिंग

धुळे जिल्ह्याच्या मातीत बागडलेल्या गान सम्राज्ञी स्व. लता दिदी..! (biography)

धुळे जिल्ह्याने अभिनानाने सांगाव्या अशा काही गोष्टींचा ठेवा धुळे जिल्हावासियांकडे आहे

त्यापैकी सर्वात मोठा आठवणींचा ठेवा आहे, गानकोकिळा, भारतरत्न, संपूर्ण देशाचा अलौकिक ठेवा स्व. लता दीदी मंगेशकर यांचे धुळे जिल्ह्यातले बालपण ! स्व. लता दीदींना कालच संपूर्ण देशाने अखेरचा निरोप दिला. त्यावेळी धुळेकर व संपूर्ण खान्देशवासियांची आपल्याच परिवारातील एक मोठा ठेवा हरपल्याची भावना होती.(biography)

स्व. लता दिदींचे आईकडचे आजोळ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील होते. आजी मुळच्या इंदोरच्या गायकी वाल्या होत्या . थाळनेरच्या लाड ( शिंपी ) यांच्याशी त्यांचे विवाह संबंध जुळले. त्या थाळनेरला येवून राहिल्या. त्यापासून त्यांना लता दिदींच्या आई ( माई मंगेशकर ) हे अपत्य झाले. मंगेशीचे मास्टर दिनानाथ हे नाटक कंपनी सोबत गावोगाव फिरत .

मास्टर दिनानाथ हे शास्त्रीय संगित करीत असत .  

खास करून स्त्री पात्रही करीत असत. त्यामुळे त्यांना विवाह समस्या होती. थाळनेरच्या लाड यांचे लांबच्या नात्यातले भाउ धुळ्यात सर्व्हिस गाड्यांचा व्यवसाय करीत असत. त्यांनी मास्टर दिनानाथांना शेवंता लाड उर्फ माई मंगेशकर यांचे स्थळ सुचविले व हा संबंध झाला. या प्रकारे अभिनय व गायकी दोन्ही बाजुंनी लता दिदींना मिळाली. अहिराणी व इतर गाणी लता दिदींच्या आई व आजींच्या ओठांवर सतत असावयाची. थाळनेर हे तापीकाठचे गाव.

एकेकाळी फारुकी राजांच्या काळात खान्देशच्या राजधानीचे हे ऐतिहासिक गाव. लता दिदीचे वडील मास्टर दीनानाथ . त्यांची गावोगावी फिरणारी नाट्य कंपनी होती. लता दिदींच्या आजी थाळनेरच्या होत्या . त्यांची मुलगी थाळनेरच्या शेवंताबाई उर्फ माई मंगेशकर यांच्याशी मास्टर दीनानाथ यांचा विवाह झालेला. लता , आशा, उषा, . मीना या चार बहिणी व हदयनाथ मंगेशकर हे एक भाऊ . अशी पाच भावंड . लता दिदींचा जन्म इंदोरला दि . २८। ०९ । १९२७ रोजी झाला . लता दिदींचे बालपण मात्र थाळनेरला गेले. lata mangeshkar

हे पण वाचा: कडुलिंबाच्या सालाचा वापर: कडुलिंबाची (neem) साल या 5 समस्यांवर रामबाण उपाय आहे.

थाळनेरच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत त्यांचे नाव १ जून १९३२ रोजी टाकण्यात आले . १९३७ पर्यंत पाचवी – सहावी पर्यंत त्यांनी थाळनेरला शिक्षण घेतले . लता दिदी १३ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील वारले. इतक्या कमी वयात त्यांच्यावर परिवाराची जबाबदारी आली. प्रारंभी त्यांनी कोल्हापूरला मास्टर विनायक यांच्या कडे चित्रपटात कामे केली . तेव्हा नुरजहाँ यांनी लता दीदींच्या आवाजातली जादू ओळखली . त्यानंतर लता दिदींनी मुंबई गाठली . प्रारंभी अभिनय व गाणे सुरु होते. मात्र त्यानंतर लता दिदींनी गाणे हेच आपले जिवित कार्य मानले.

त्यानंतरचा त्यांच्या दैवी कर्तुत्वाचा प्रचंड इतिहास जगासमोर आहे. लता दिदींना इतके सर्वोच्च पुरस्कार मिळाले, की त्याची गणना नाही . नंतर लता दिदींच्या नावामुळे ते पुरस्कारच सन्मानित व्हावेत अशी स्थिती झाली. स्व . पु . ल . देशपांडेंनी खूप चांगल्या शब्दात वर्णन केले होते . ” आकाशात देव आहे की नाही , मला माहित नाही . पण आकाशात चंद्र , सुर्य आणि लता दिदींचा स्वर कायम स्वरूपी आहे . प्रत्येक क्षणास लता दिदीचा आवाज कुठून तरी कुठे जातच असतो .

 जवळपास ७५ ते ८० वर्षे लता दिदी आपल्या स्वर्गिय स्वरात गात होत्या.

पन्नास हजारावर गिते त्यांनी गायली. एकेका दिवसात सहा सहा गितेही गायली . या स्वर्गिय सुरांमुळे लतादिदी अजरामर आहेत. त्यांचे ” ए मेरे वतन के लोगो . . . ” हे गित ऐकताच डोळ्यात पाणी आले नसेल असा भारतवासीय विरळाच असेल. विशेष म्हणजे फारशी रिहलर्सला वेळ न मिळाल्याने लता दिदींनी हे गीत उत्स्फूर्तच गायले होते. तेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंचेही डोळे पाणावले होते. प्रत्येक भारतीयांच्या वेगवेगळ्या भाव भावनांना केव्हातरी स्पर्श करणारे गीत लता दिदींचेच राहिले आहे. (biography)

मा. बाळासाहेब ठाकरे, ना. नरेंद्र मोदींपासून देशातल्या कितीतरी सर्वोच्च व्यक्तिमत्त्वांनी स्व. लता दिदीं बाबत वेळोवेळी सन्मान व्यक्त केला आहे. हे उत्तुंगाहूनही उत्तुंग असे व्यक्तिमत्व धुळे जिल्ह्याच्या मातीत खेळले बागडले आहे . त्याचा धुळे जिल्हावासियांना अभिमान आहे. लता दिदी ज्या घरात बालपणी राहिल्या बागडल्या ते घर थाळनेरमध्ये आजही आहे . जुने कडी पाटाचे ते घर आहे . प्राथामिक शिक्षक पंढरीनाथ कोळी यांचा परिवार या घरात राहिला . या घरासमोर माई मंगेशकरांनी एकत्रित निंब व पिंपळाचे झाड लावले होते. (biography)

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

ते आजही आहे . लता दिदींनी आपल्या आई माई मंगेशकर यांच्या इच्छे नुसार थाळनेरला एक चांगले खंडेराव मंदिर १९६७ मध्ये बांधले होते . त्यावर कोनशिला आहे . ” कै . हरीदास रामदास लाड यांच्या पुण्यस्मरण प्रित्यर्थ यांच्या कन्या श्रीमती माई मंगेशकर यांनी श्री खंडेराव म.चे मंदिर मिती मार्गशीर्ष वद्ध १९६७ रोजी बांधविले .” लता दिदींचे भाउ हृदयनाथ मंगेशकर १९९० मध्ये धुळ्यास आले होते . तेव्हा गरुड मैदानात त्यांचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा व जळगावला आले तेव्हा त्यांनी थाळनेरला भेट दिली होती. १९९५ – ९६ ची ही घटना आहे. मंगेशकर परिवाराची थाळनेरला १८ एकर शेतीही होती असे सांगितले जाते.

थाळनेरच्या जमादार परिवाराशी दीदींचे चांगले संबंध होते .

दोंडाइच्याचे दादासाहेब राउळ यांची मुलगी ताईसाहेब जमादार या परिवारात सून होती. त्यांच्या सासर्‍यांवर लता दिदींनी एक गाणेही म्हटले होते, असे सांगितले जाते. थाळनेरच्या काही मंडळीनी थाळनेरला संगित विद्यालय काढावे यासाठी लता दिदींकडे पाठपुरावा केला होता . पण ही इच्छा पूर्ण झाली नाही. लता दिदी उभ्या आयुष्यात नंतर कधिही थाळनेरला आल्या नाहित. या मागे वेगवेगळी कारणे असू शकतात. (biography)

लता दिदीं प्रमाणेच स्व . स्मीता पाटील यांनी धुळे जिल्हा व शिरपूर तालुक्याचे नाव देशात मोठे केले आहे. जेव्हा जेव्हा चित्रपट सृष्टीचा इतिहास चर्चिला जातो. तेथील गीत, संगित, नृत्य, अभिनय या क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा संबंध असणारी अनेक उत्तुंग नावे घेतली जातात. त्या सर्वांच्या वर उत्तुंगाहून उत्तुंग नाव स्व . लता दिदींचे घेतले जाते. त्यांच्या स्मृतीस विनम्र मानवंदना !

हे पण वाचा : PM Modi Yojana 2022: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी सरकारी योजना

अधिक माहतीसाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी योजना सूची 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!