ट्रेण्डिंगशेती कट्टा

(landscaping) खतांची खरेदी करताना एमआरपी, सबसिडी पाहाल! जाणून घ्या कोणत्या खता मागे किती सबसिडी

जिल्हानिहाय WhatsApp ग्रुप Join करा

खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यात रासायनिक खतांची जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक खताची मूळ किंमत, सबसिडी, एमआरपी पाहून खरेदी करणे आणि त्यानंतर कृषी विभागाकडे तक्रार करणे आवश्यक आहे.गेल्या काही महिन्यांत कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली, असा दाखला देत काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खते या खतांच्या किमतीत वाढ केली आहे. (landscaping)

या दरवाढीनंतरही जिल्ह्यात खतांचा कृत्रिम तुटवडा भासवून जादा दराने खतांची विक्री करण्याचा प्रकार काही खत विक्रेते करीत आहेत. अशात शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने खतांसाठी दिलेली सबसिडी आणि एमआरपी पाहूनच खत खरेदी करणे आवश्यक असून, विक्रेता लुबाडणूक करीत असल्याचे दिसल्यास कृषी विभागाकडे तक्रार करायला हवी, असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. (landscaping)
कृत्रिम टंचाई, की तुटवडा

कृत्रिम टंचाई, की तुटवडा
ऐन खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माणम झाल्याचे दर्शवित दुकानदार जादा दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. कृषी विभागाच्या लेखी मात्र जिल्ह्यात डीएपी वगळता इतर खतांचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरोखर खतांचा तुटवडा आहे की, कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रकार आहे, ते कळेनासे झाले आहे. (landscaping)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!