ट्रेण्डिंग

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

जमीन खरेदीतील ( land purchase) फसवणूक टाळण्यासाठी आता भूआधार क्रमांक मिळणार आहे. एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती मिळणार आहे.

जमीन खरेदीतील ( land purchase) फसवणूक टाळण्यासाठी आता भूआधार क्रमांक मिळणार आहे. एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती मिळणार आहे.जमीन खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी आता भूआधार म्हणजेच यूएलपीएन क्रमांक देण्याची मोहीम राबवली गेली आहे. (Unique Land Parcel Identification Number project) शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वच जमिनींना भूआधार मिळणार असल्याने जमीन खरेदी करतानाची फसवणूक टळणार आहे

ज्यात सुमारे 2 कोटी 52 लाख सातबारे असून, सुमारे 70 लाख मिळकत पत्रिका आहेत. या सर्व सातबारा मिळकत पत्रिकांना भूआधार मिळणार आहे. यामुळे सातबाऱ्याचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्याची माहिती उपलब्ध होणार आहे. राज्यात युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर प्रकल्प सुरु होत आहे. सामान्यतः जमिनीसाठी आधार म्हटल्या जाणार्‍या, राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी आता भूआधार क्रमांक (11-अंकी क्रमांक) दिला जाईल. हे प्रत्येक सर्वेक्षण केलेल्या जमिनीचे भूआधार क्रमांक ओळखण्यात आणि जमिनीशी संबंधित फसवणूक रोखण्यात मदत करेल. राज्याने या प्रकल्पाला “तत्वत:” मान्यता दिली असून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.( land purchase)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!