ट्रेण्डिंगशेती कट्टासंपादकीयसामाजिक कट्टा

Input subsidy : यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव निधी मिळणार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त २६ लाख शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची वाढीव मदत जाहीर.

अतिवृष्टीग्रस्त २६ लाख शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची वाढीव मदत जाहीर.

(Input subsidy): राज्यातील अतिवृष्टीग्रस्त २६ लाख शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची मदत जाहीर. सोमवारपासून बॅंक खात्यात पैसे जमा होणार. गोगलगायींमुळे झालेल्यांनाही नुकसानभरपाईचे आदेश जारी.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्तीप्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. राज्यात जुलै,२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.१०.०८.२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२२/प्र.क्र.२५३/म-३,

येथे क्लिक करून पहा जिल्ह्यानुसार यादी

👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

दि.२२.०८. २०२२ अन्वये जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
तसेच इतर नुकसानीकरीता शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. ११.०८.२०२१ अन्वये ज्या बाबींकरिता वाढीव दराने मदत अनुज्ञेय करण्यात आली होती त्याच दराने या कालावधीसाठी मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. उर्वरित बाबींसाठी शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. १३.५.२०१५ अन्वये विहित करण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत अनुज्ञेय आहे.(Input subsidy)

शेतकरी होणार मालामाल महाराष्ट्र शासनाच्या शेळीपालन योजनेतर्गत 6 लाख रुपयांपर्यंत अनुदान अनुदान जाहीर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!

जून ते ऑगस्ट, २०२२ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता/ शेतीपिकांच्या नुकसानीसाठी संदर्भ क्र. २ येथील दि.२२.८.२०२२ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात आले होते. त्यानुसार ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२२ पर्यंत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांचेकडुन संदर्भाधीन क्रमांक ३ ते ८ येथील पत्रान्वये प्राप्त झाले आहेत. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांचे नुकसान व शेतजमिनीचे नुकसान याकरिता मदतीचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. (Input subsidy)

जून ते ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता अनुक्रमे रु. ३४४५२५.५५ लक्ष व रु.५६४५.६६ लक्ष असा एकूण रु. ३५०१७१.२१ लक्ष (अक्षरी रुपये तीन हजार पाचशे एक कोटी एकाहत्तर लक्ष एकवीस हजार (फक्त) इतका निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र अ-१ व प्रपत्र अ-२ मध्ये जिल्हा निहाय दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार येथे क्लिक करून पहा

👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

२. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र अ- १ व प्रपत्र अ-२ प्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडून लेखाशीर्षनिहाय निधी मागणीनुसार विभागाच्या बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या निधीमधून शक्य तितक्या विभागांकरिता विभागीय आयुक्त यांना कार्यासन म-११ यांनी तात्काळ निधी वितरित करावा. (Input subsidy)

अधिक माहितीसाठी जॉईन करावा आमचा व्हॉट्सॲप ग्रूप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!