ट्रेण्डिंग

गुढीपाडवा आणि संभाजी महाराज

गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी शंभुराजांची हत्या झाली 

मग गुढीपाडवा साजरी करावा की नाही ?

#गुढीपाडवा_आणि_संभाजी_महाराज ❤️🚩

        शंभुराजेंनी बलिदान दिलं ते धर्मासाठी आपल्या “हिंदवी स्वराज्य” टिकविण्यासाठी 

आपले सणवार, संस्कृती टिकुन रहावी म्हणुन आपल्या शुरवीर पुर्वजांनी बलिदान दिले आहे. आपल्या वर्षभरातील एकही तारीख अशी नसेल ज्या दिवशी देशभक्ताचं बलिदान झालं नसेल. अलेक्झांडरचा स्वारीनंतर आपल्या देशावर किती परकिय आक्रमणं झाली याची गणणाच नाही. पण आपल्या शुर भारतीय योद्धांनी देव देश धर्मासाठी बलिदान दिले. मग आपण त्यांचा दुखवटा पाळत बसलो (दुखवटा पाळू नये असा समज करून घेऊ नये) आणि आपली संस्कृती व सणवार टाळत बसलो तर तो शंभुराजांसारख्या असंख्य धर्मयोद्धांचे बलिदान व्यर्थ गेल्यासारखे होईल. म्हणुन आपला गैरसमज होता कामा नये. श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर किंवा युवराज छत्रपती शंभुराजांच्या मृत्युनंतर मराठे असेट दुखवटे पाळत बसले असते तर काय झाले असते याचा विचार व्हावा.  (gudi padwa)

        औरंग्याने शंभुराजांची हत्या गुढीपाडव्याच्या एक दिवस आधीच मुद्दाम केली होती. कारण त्याला ठाऊक होतं दुसऱ्या दिवशी हिंदूंचा पवित्र सण आहे. म्हणुन त्याने तो दिवस निवडला. आपण त्याच्या कपटाला बळी पडता कामा नये. आपण महिनाभर संभाजी महाराज बलिदान मास पाळतो की नाही? तीच श्रद्धांजली असते शंभुराजांना 🙏❤️

       शंभु राजांचे बलिदान व्यर्थ न जावो म्हणुन हिंदू धर्म रक्षणार्थ संकल्प करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आहे. 

आजही अनेक औरंग्याच्या औलादी जिवंत आहेत. त्या कधी भारत विरोधी घोषणा देतात, तर कधी वंदे मातरम ला विरोध करतात. कधी हिंदूंची देवळं उध्वस्त करतात तर कधी हिंदू आया बहिणींवर अत्याचार करतात.

       अश्या औरंग्याच्या नाजायज पिलावळींना ‘शिवराय व शंभुराजांचे’ स्वप्न पुर्ती करणारे धर्मवीर मावळे जिवंत आहेत हे दाखवणे गरजेचे आहे. म्हणुन गुढीपाडव्यास शंभु राजांच्या हत्येचा प्रतिशोध म्हणुन हिंदूंनी #हिंदूराष्ट्र_स्थापनेचा_संकल्प घ्यायचा आहे.  (gudi padwa)

 हे पण वाचा: Youtube पर सबसे ज्यादा पैसा कौन कमाता है..? Youtube से भारत मे लोग कितना पैसा कमाते है ।

त्यामुळे लक्षात घ्या 

गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. हिंदूंनी तो साजरा करू नये, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता. वस्तूतः हत्येचा गुढीपाडव्याच्या दिवशी उभारल्या जाणार्‍या गुढीशी काहीच संबंध नाही. प्रभु श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या उभारणे, तोरणे लावणे, ही आपली परंपरा आहे. सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणूनही गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केल्याचे मानले जाते. म्हणजेच खरे तर हा दिवस केवळ हिंदूंचाच नसून अखिल विश्‍वातील मानवजातीचा आहे. (gudi padwa)

     दुसरा मुद्दा • हत्या झाली तो दिवस अमावस्येचा असुन दुसऱ्यादिवशी गुढीपाडवा होता हे खरे असले तरी हिंदु परंपरेनुसार एकच वर्ष दुखवटा म्हणून सण साजरा केला जात नाही. माञ दुसऱ्या वर्षापासून साजरा केला जातो. शिवाय राजेंच्या हत्तेनंतर कुणाच्यातरी सांगण्यावरुन गुढी उभा करण्याची प्रथा सुरु झाली हे साफ खोटे आहे. 

        महाराष्ट्रातील देशपरदेशात विखुरलेले मराठी बांधव त्या त्याठिकाणी कित्येक वर्षापासून गुढीपाडवा साजरा करतात. त्यामुळे छञपती संभाजीराजेंची हत्या आणि गुढीपाडवा या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत.

         विशेष म्हणजे छञपतींच्या सातारा आणि कोल्हापूर येथील दोन्ही गाद्या व संभाजीराजेंच्या मामाचे गाव फलटणचे निंबाळकर घराणे दरवर्षी गुढी उभी करतात. 

          जाता जाता एकच अशाचप्रकारे सेनापति संताजी घोरपडेची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाने संताजीचे शिर भाल्यावर लटकाऊन सर्वत्र फिरविले होते. त्यावेळी कुठला सन साजरा केला ? येवढे वाचल्यानंतर प्रत्येकाने ठरवावे गुढी पाडव्याचा सण कसं साजरा करावा. 

लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी! अहो ज्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी प्राण वेचले त्या धर्मातील एखाद्या सणाचा असा अपप्रचार करून आपण त्यांचाच अपमान करत आहोत ही गोष्ट लक्षात येत नाही का ह्या लोकांना.?

खरतरं गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा काही एक संबंध नाही ये, तो औरंगजेबाने जोडला आणि अजूनही धर्म द्वेष करणारे लोक तो पुढे चालवत आहेत. अहो जर हा सण संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे चालू झाला असता. तर हिंदू धर्माच्या सणांची जी पोथी आहे जी की बरीच पुरातन आहे त्यात कशाला ब्रह्मध्वज पूजन या नावाने गुढीपाडव्याचा उल्लेख आला असता?

त्याच बरोबर जर गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चालू झालेला सन असता तर मग त्या आधी होऊन गेलेल्या संतांच्या संत साहित्यात त्याचे वर्णन नको यायला हवे होते. पण तसे होत नाही, प्रभुरामचंद्रापासून, ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या साहित्यात गुढीचे उल्लेख आढळून येतात.

संत साहित्यातील अनेक ठिकाणी आपल्याला गुढीचे वर्णन आलेले दिसते ज्यातील काही निवडक उदाहरणे खाली देत आहे. (gudi padwa)

हे पण वाचा (milk dairy) दूध डेअरी व्यवसायासाठी सरकार देत आहे अनुदान; ६६ टक्के सब्सिडी घेऊन सुरू करा डेअरी फर्म

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत

अधर्माची अवधी तोडी। दोषांची लिहिली फाडी। सज्जनांकरवी गुढी। सुखाची उभवी।।

अध्याय क्रमांक 4 ओवी 52

ऐके संन्यासी तोची योगी। ऐसी एकवाक्यतेची जगी।गुढी उभविली अनेगी। शास्त्रांतरी।।

अध्याय क्रमांक 6 ओवी 52

माझी अवसरी ते फेडी। विजयाची सांगे गुढी।येरू जीवी म्हणे सांडी। गोवी यिया।।

अध्याय क्रमांक 14 ओवी 410

हे झालं ज्ञानेश्वरीत

संत एकनाथ महाराजांच्या रचनेत अनेक ठिकाणी गुढीचा उल्लेख येतो. जसे की श्रीराम चरित्र वर्णन करताना महाराज म्हणतात,

फेडावया देवाची साकडी। स्वधर्म वाढवावया वाढी।नामे मोक्षाची उभवावया गुढी। सूर्यवंशा गाढी दशा आली॥

पुढे श्रीकृष्ण चरित्रात नाथ महाराज म्हणतात 

गुढीयेसी सांगू आले। कंस चाणुर मर्दिले। हर्षे नाचताती भोजे। जिंकियेले यादवराजे।।

गुढी आली वृंदावना। मथुरा दिली उग्रसेना। झाला त्रिभुवनी उल्हास। लळीत गाये भानुदास।।

त्यानंतर तुकाराम महाराजांचे काही अभंग आहेत ज्यात गुढीच वर्णन आहे.

1) ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती।गुढीया उभविती घरोघरी।

घरोघरी सुख आनंद सोहळा। सडे रंगमाळा चौकदारी।।

2) गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा।

बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी।

गुढिया तोरणे करिती कथा गाती गाणे।

3) आली दारा देखे हरूषाची गुढी। सांगितली पुढे हरूषे माते।

हरूषली माता केले लिंबलोन।

गोपाळा वरून कुरवंडी।।

संत चोखामेळा यांचा गुढीचा उल्लेख असलेला अभंग

टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट हे चालावी पंढरीची ॥

पंढरीची हाट कऊलांची पेठ। मिळाले चतुष्‍ट वारकरी।।

पताकांचे भार मिळाले अपार। होतो जयजयकार भीमातिरीं।।

हरिनाम गर्जतां भय नाहीं चित्ता। ऐसे बोले गीता भागवत।।

खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा।

एकंदर सांगायचा आशय काय तर संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसाचा आणि गुढीपाडव्याचा संबंध हा एक निर्माण केलेला भ्रम आहे. त्यामुळे माझी सगळ्या हिंदू बांधवांना विनंती आहे की धर्म विरोधी लोकांच्या भुलथापांना बळी पडू नये.

आनंदाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने गुढी पाडवा साजरा करावा आणि हिंदू धर्माची गुढी दिवसेंदिवस अधिक भव्य अधिक उंच कशी होईल याकडे प्रयत्न चालवावे (gudi padwa)

  टिप – साडी वर उलटा तांब्या, लिंबाचा फांदी हे कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतिक आहेत.

श्रीराम 🙏😇❤️

हे पण वाचा ( SBI Prime Visa Unsecured ) एसबीआई प्राइम क्रेडिट कार्ड की मुख्य विशेषतायें और लाभ वेलकम बेनिफिट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!