ट्रेण्डिंग

Governor Koshyari Covid Positive : मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

Governor Koshyari राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Governor Koshyari राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना आज सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


Governor Koshyari राज्यात मागील दोन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने संभाव्य राजकीय घडामोडींबाबत अनेक प्रश्ननिर्माण झाले आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरते. सध्या सुरू असलेल्या राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यपाल राज्य सरकारला विश्वास मत सिद्ध करण्याच्या सूचना देण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला किमान सात दिवसांचा अवधी मिळाला असल्याचे म्हटले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!