ट्रेण्डिंग

Government Hostels: मोफत प्रवेश! वसतिगृहांमध्ये एक हजार 176 जागा रिक्त, आठवीनंतर प्रवेश मोफत

Government Hostels आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 23 वसतिगृहांमधील 2 हजार 485 जागांपैकी 1 हजार 309 प्रवेश झाले आहेत. सध्या 1 हजार 176 जागा रिक्त आहेत.

👉प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे पाण्यासाठी इथे क्लिक करा👈

 पुणे जिल्ह्यातील (Pune City)  शासकीय वसतिगृहाची (Government Hostel)  विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या वसतिगृहांमध्ये आठवीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. सध्या पुणे जिल्ह्यातील (Pune City)  शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मुलींसाठी देखील काही शासकीय वसतिगृह राखीव  आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 23 वसतिगृहांमधील 2 हजार 485 जागांपैकी 1 हजार 309 प्रवेश झाले आहेत. सध्या 1 हजार 176 जागा रिक्त आहेत. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यासाठी जिल्ह्यामध्ये 10 वसतिगृहांमध्ये अद्यापही 416 जागा रिक्त आहेत. Government Hostels

👉कोणत्या भागात किती जागा पाण्यासाठी इथे क्लिक करा👈

प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन व्यवस्था

  • शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशासाठी लेखन साहित्याकरिता ४ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता
  • दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा ५०० रुपये निर्वाह भत्ता,
  • शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाच्या दोन संचाकरिता गणवेश भत्ता असे वेगवेगळे भत्ते मिळतात.

 24 ऑगस्ट पासून पदवीच्या विद्यार्थ्याचे प्रवेश सुरू

15 जुलैपर्यंत आठवीच्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाची मुदत होती. त्याची यादी 18 जुलैला लागणार आहे; मात्र अद्यापही आमच्याकडे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकतात, तसेच 5ऑगस्ट रोजी 11,12 ऑगस्टपर्यंत चीच्या विद्याथ्र्यांची प्रवेश प्रक्रिया तर 24 ऑगस्ट पासून पदवीच्या विद्यार्थ्याचे प्रवेश सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह इंदापूरचे रेक्टर पी. आर. हेळकर यांनी माहिती दिली. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व भागांनी मिळून वार्षिक उत्पन्न अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता 2 लाख 50 हजारांच्या आत असलेले तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या आत असलेले प्रमाणपत्र, अर्जासोबत संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांच्या सहीचा असतात.Government Hostels

ही पण बातमी वाचा

पुन्हा पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख जाणून घ्या

Government Hostels
Government Hostels

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!