ट्रेण्डिंग

धेनू अँपच्या आधुनिक तंत्रामुळे शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा फायदा Dhen App

Dhen App आज-काल कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की त्यासाठी लागतो तो अनुभव आणि हा अनुभव घेण्यासाठी त्या व्यावसायिकाला प्रशिक्षण घ्यावे लागते इतरत्र भेटी द्याव्या लागतात त्यासाठी येण्याजाण्यासाठी खूप खर्च होत असतो आणि वेळही वाया जात असतो. एवढेच काय तर कधी-कधी मानसिक त्रासही सहन करावा लागतो. डिजिटल तंत्रज्ञानामुळे कोणालाच कोणासाठी वेळ शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे आपल्याला मोफत काही गोष्टी शिकायला किंवा पाहायला मिळतील ही आशाच न बाळगलेले केव्हाही बरे.(Dhen App)
आज-काल दुग्धव्यवसायामध्ये उतरू पाहात असणाऱ्यांना शेतकऱ्याला पशुपालन व दुग्धव्यवसातील आधुनिक तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान नसते. अशावेळी काही जुने व्यवसायिक त्या नवीन व्यावसायिकाला सखोल माहिती देत नाहीत त्यामुळे त्यांचा भरमसाठ पैसा आणि वेळही वाया जातो अशावेळी दुग्धव्यवसाय परवडत नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याकडे जनावरे विकून टाकण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नसतो. हे सर्व घडण्याचे मुख्य कारण म्हणजेच दुसऱ्याचे पाहून, दुसऱ्याच्या ऐकण्यावरून किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे सुरू केलेला व्यवसाय होय. कोणत्याही व्यवसायाला एक आराखडा एक बजेट प्लॅन असतो त्या प्लॅन प्रमाणेच जर आपण व्यवसायामध्ये बदल करत गेलो तर नक्कीच आहे तशी प्रतिकृती तयार होते आणि यशस्वी प्रकारे दुसरं युनिट तयार होतं.(Dhen App)

Dhen App

हे पण वाचा>(mahadbt) पाईपलाईन 90% अनुदान योजना


(Dhen App) महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालकांचा विकास व्हावा व त्यांना दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची तत्पर माहिती आपल्या मोबाइलवर मोफत मिळावी या उद्देशाने धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ग्रामीण शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी त्यांना दुग्धव्यवसायातील विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धेनू अॅप विकसित केले आहे या धेनू अॅपच्या माध्यमातून लाखों शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे गोठे यशस्वी केले आहेत.
धेनू अँप(Dhen App) ने लॉकडाऊन च्या काळात आधुनिक डेअरी फार्म स्पर्धा आयोजित केली होती.

हे पण वाचा>अखेर पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार पैसे जमा..PM Kisan

त्यामध्ये महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या गोठ्यातील आधुनिकता, जसे कि चारा व खाद्य व्यवस्थापन, संपूर्ण गोठा व्यवस्थापन, गोठ्यातील यांत्रिकीकरण, कमी खर्चातील मुक्त संचार गोठा, गोठ्यातील विविध जुगाड तंत्रज्ञान, मुरघास बंकर, टी.एम.आर तंत्रज्ञान, यासारख्या विविध विषयाला धरून आपल्या गोठ्याची ऑडिओ व व्हिडिओ स्वरुपात सविस्तर माहिती दिली होती. या स्पर्धेचा फायदा असा झाला की शेतकऱ्यांना घरबसल्या प्रयोगशील शेतकऱ्यांचे गोठे तर पाहायला मिळालेच परंतु कोणते तंत्रज्ञान कशासाठी वापरले जाते याची सुद्धा सविस्तर माहिती मिळाली. तसेच शेतकऱ्यांच्या गोठ्याचा संपूर्ण व्हिडिओ धेनू अँप मध्ये जतन असल्याने तो वारंवार पाहायला येतो आणि तो गोठा पाहून आपल्या व्यवसायात बदल करण्यासाठी मदतही होते.(Dhen App)

हे पण वाचा>शेतकऱ्यांनो आता सरपंचांच्या मागे लागा!! शेतातील रस्त्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, सगळ्यांना मिळणार रस्ते..

या स्पर्धेमुळे आपल्या भागात असणाऱ्या पशुपालकांचे गोठे कुठे आहेत, त्यांच्याकडे जनावरे किती आहेत, त्यांची एकात्मिक गोठा व्यवस्थापन पद्धती कशी आहे व प्रयोगशील शेतकऱ्यांची कमी खर्चातील जुगाड तंत्रज्ञाने समोर आली आणि ती जुगाड तंत्र इतर शेतकऱ्यांना समजल्यामुळे त्यांचा होणारा जास्तीचा खर्च वाचून वेळेतही बचत झाली. आता शेतकऱ्यांच्या खिश्यातच दुग्धव्यवसायातील माहिती व तंत्रज्ञानाची बँक असल्यामुळे लागेल त्या वेळेला लागेल लागेल त्या ठिकाणी, लागेल ती माहिती मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना कुठे ही भटकंती व पैसाही खर्च करावा लागणार नाही. धेनूची आधुनिक डेअरी फार्म स्पर्धा ही महाराष्ट्रातील पशुपालकांचा डिजिटल पद्धतीने विकास करणारी पहिली ऑनलाईन स्पर्धा ठरली आहे(Dhen App)

पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…(Dhen App)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!