ट्रेण्डिंग

(Cotton Rate) पहाच हे कापसाचे खुश करणारे भाव, गेल्या पन्नास वर्षा मध्ये जे झाले नाही ते या वर्षी होत आहे

खरीप हंगामात कापसाचे उत्पादन घटल्याने यंदा दर तेजीत राहणार हे साहजिकच होते. इथपर्यंत तर शेतकऱ्यांनीही अंदाज बांधून हंगामाच्या सुरवातीपासून Cotton Stock कापूस साठवणूकीवर भर दिला होता. मात्र, अपेक्षित दर मिळताच शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना कापसाची विक्री केली. शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला असला तरी यापेक्षा कित्येक पटीने फायदा हा व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे. कारण शेतकऱ्यांनी विक्री केल्यानंतर आता Cotton Rate कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. जिल्ह्यातील अकोट बाजार समितीमध्ये जे गेल्या 50 वर्षामध्ये झाले नाही ते यंदा घडले आहे. सोमवारी 11 हजार 845 असा विक्रमी दर मिळाला आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाची विक्री केली Cotton Stock . त्यामुळे वाढत्या दराचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे बोलले जात आहे. (Cotton Rate)

वाढीव दर मिळवण्यासाठी संबंध चार महिने जे शेतकऱ्यांनी केले त्यापेक्षा महिनाभरात अधिकचा मोबदला हा व्यापाऱ्यांना मिळालेला आहे.Cotton

उत्पादनात घट, वाढीव दराने दिलासा

खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयाबीन आणि कापसाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. Cottonकापूस पीक अंतिम टप्यात असतानाच ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्यावरच आले होते. महाराष्ट्रसह इतर राज्यामध्येही कापसाचे उत्पादन घटले. गेल्या काही वर्षापासून कापूस क्षेत्रात घट होत असतानाच घटलेले उत्पादन यामुळे यंदा विक्रमी दर मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता.अखेर तो सत्यात उतरला असून वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Cotton Rate)

(IAS Full Form ) IAS Kaise Bane व IAS बनने के लिए क्या करें पूरी जानकारी

Cotton कॉटन सिटी’ ला मिळणार गतवैभव

काळाच्या ओघात अकोला जिल्ह्यातही कापसाचे क्षेत्र हे घटले आहे. कापसाचे दर आणि बोंडअळीमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन खरिपात सोयाबीनला पसंती दिली आहे. त्यामुळे सरासरी क्षेत्रापेक्षा कमी लागवड झाली होती. पण यंदाचे उत्पादन आणि मिळालेले विक्रमी दर यामुळे पुन्हा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सध्या शेतकरी फरदडमधून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत असले तरी आगामी वर्षात परस्थिती बदलेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत. (Cotton Rate)

👇👇👇👇
येथे क्लिक करा

अकोला बाजार समितीचा 50 वर्षातला कापसाचा ऐतिहासिक दर Cotton Rate

Kotak811 Account काय आहे | Kotak811 Savings Account in Marathi कोटक महिंद्र बँकची संपूर्ण माहिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!