ट्रेण्डिंगशेती कट्टा

Cotton : कापूस दरातील तेजी पुन्हा परतणार? असा असणार भाव

Cotton Rate

Cotton देशात खरिपाच्या पेरण्या (Kharif Sowing) आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशातील कापसाखालील क्षेत्रात (Area Under Cotton) सुमारे 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, देशातील बाजारपेठेत कापसाचे दर वाढले आहेत.

ब्राझीलने मका रोखल्याने दरात सुधारणा

अमेरिका आणि चीननंतर ब्राझील हा जगातील दुसरा सर्वात मोठा मका उत्पादक देश आहे. ब्राझीलमधील उत्पादन आणि साठा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर प्रभाव टाकतात. ब्राझीलमध्ये सध्या मक्याचे मोठे साठे आहेत. ब्राझीलमधील मक्याचा साठा सध्या 43 दशलक्ष टनांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 110 लाख टन होता. तज्ज्ञांनी म्हटले आहे की ब्राझीलने आपला साठा रोखून कॉर्नच्या वाढीला पाठिंबा दिला आहे. मका वायदे शुक्रवारी एक टक्का वाढून $6.09 डाॅलर प्रति डाॅलरबुशेल होता. देशात मक्याचा भावही 2200 ते 2600 रुपयांच्या दरम्यान राहिला. आंतरराष्‍ट्रीय बाजारात मक्‍याच्‍या तुटवड्यामुळे भावात कोणताही बदल होणार नसल्‍याचा तज्ञांचा अंदाज आहे.Cotton

गव्हाची आवक वाढल्यानं दर स्थिरावले

देशातील बाजारपेठेत गव्हाची आवक गेल्या काही आठवड्यांपेक्षा कमी होती. त्यामुळे भावात 2100 रुपयांवरून 2500 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या बाजारपेठेत गव्हाची आवक अचानक वाढू लागली आहे. या वाढलेल्या दरात व्यापारी नफा वसूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणकार सांगत आहेत. मात्र बाजारातील आवक वाढीमुळे दरवाढ थांबली आहे. बाजारातील आवक वाढल्यास गव्हाचे दर एक ते दोन टक्क्यांनी खाली येतील, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

👉(Aadhar Card) : बातमी कामाची! आधारमध्ये ‘या’ पद्धतीने बदला आपली जन्मतारीख, ते पण आपल्या मोबाईलव👈

काबुली हरभऱ्याचे दर सुधारण्याची शक्यता

जगात काबुली हरभऱ्याला चांगली मागणी आहे. भारतात त्याचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे ही गरज आयातीतून भागवली जाते. भारतात गेल्या हंगामात केवळ 2.5 लाख टन काबुली हरभऱ्याचे उत्पादन झाले होते. त्यामुळे यावेळी या हरभऱ्याचा तुटवडा आहे. परिणामी काबुली हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली. सध्या देशात काबुली हरभऱ्याला सरासरी 9 हजार ते 10 हजार रुपये भाव आहे. आयात केलेला काबुली हरभराही 10 हजार ते 11 हजारांना विकला जात आहे. येत्या काळात काबुली हरभरा पुरवठा कमी राहील किंवा दरात एक ते तीन टक्क्यांनी सुधारणा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

निर्यात वाढल्यास साखरेचे दर वाढण्याचा अंदाज

साखर उद्योग सातत्याने साखर निर्यातीला परवानगी देण्याची मागणी करत होता. त्यामुळे केंद्राने 7 लाख 77 हजार टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. मात्र कारखान्यांनी अधिक साखर निर्यातीची मागणी केली होती. देशातील साखरेच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात साखर 36 ते 39 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. देशातून साखरेची निर्यात वाढल्यास किरकोळ साखरेचे दर दोन ते तीन रुपयांनी वाढू शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीला परवानगी देताना सरकार देशातील किमतीचे मूल्यांकन करत असल्याचे उद्योगांनी म्हटले आहे.

👉(sbi credit card): किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज तीन लाखापर्यंत मिळणार कर्ज👈

कापूस दरातील तेजी पुन्हा येणार?

गेल्या हंगामात कापसाला चांगला भाव (Cotton Rate) मिळाला होता. देशातील कापूस उत्पादन (Cotton Production) 20 टक्क्यांनी घटले, परंतु वापर 30 टक्क्यांनी जास्त राहिला. त्यामुळे कापसाचे भाव वधारत (Boom In Cotton Rate) होते. शेतकऱ्यांना 8 हजार ते 9 हजार रुपयांपर्यंत दरही मिळाला. त्यामुळे यंदा कापूस लागवडीत (Cotton Cultivation) 15 टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असा अंदाज आहे. मात्र सध्या कापसाच्या तेजीचा वेग मंदावला (Cotton Rate In Global Market) आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर घसरले आहेत. परिणामी, सुरुवातीच्या काळात कापूस लागवडीची वाढ आता मंदावली आहे. Cotton

👉ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा 👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!