ट्रेण्डिंग

(Aadhar Card) : बातमी कामाची! आधारमध्ये ‘या’ पद्धतीने बदला आपली जन्मतारीख, ते पण आपल्या मोबाईलवर

Aadhar Card

(Aadhar Card): युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) यांच्याकडून भारतीय नागरिकांना आधार कार्ड (Aadhar) जारी केले जाते. मित्रांनो भारतात आधार कार्ड एक महत्वाचं डॉक्युमेंट (Important Document) आहे. आधार कार्ड भारतात एक मुख्य ओळखीचा पुरावा (Identity Proof) म्हणून उपयोगात आणले जाते.

आपल्या देशात आधार कार्डविना साधं एक सिम देखील खरेदी करता येत नाही. दरम्यान UIDAI आपल्या आधार कार्ड धारकांच्या सोयीसाठी विविध सुविधा पुरवत असते. त्यापैकी एक म्हणजे आधार कार्ड तपशील अपडेट करणे. आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे.

👉येथे क्लिक करून बदला आपली जन्मतारीख👈

मुलांना शाळा, महाविद्यालयात प्रवेश, प्रवास करताना, बँक खाते उघडणे, ITR भरणे, रेशन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी सर्व कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अशा परिस्थितीत हा महत्त्वाचा दस्तऐवज अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो आधार कार्ड बनवताना काही वेळा चुकीची माहिती टाकली जाते. यामध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी सारख्या लोकसंख्याशास्त्रीय तपशीलांचा समावेश आहे.

अशा परिस्थितीत, UIDAI आपल्या कार्डधारकांना हे सर्व तपशील अपडेट करण्याची परवानगी देते. जर तुमच्या जन्मतारखेत काही चूक असेल तर तुम्ही ती सहज दुरुस्त (Aadhar Card DOB Update) करू शकता, मात्र आधारमध्ये जन्मतारीख माहिती अपडेट करण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

👉जन्मतारीख बदलण्याच्या अटी येथे क्लिक करून पहा👈

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, UIDAI च्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीची नोंदणीकृत जन्मतारीख आणि मूळ जन्मतारीख यांच्यामध्ये 3 वर्षांपेक्षा कमी अंतर असल्यास, ही माहिती जवळच्या आधार सुविधा केंद्रावर अपडेट केली जाईल. दुसरीकडे, जर हा फरक तीन वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ते अपडेट करण्यासाठी प्रादेशिक आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीला आधारमध्ये लिंग दुरुस्त्या करायच्या असतील, तर त्याला ते अपडेट करण्याची एकच संधी मिळेल.(Aadhar Card)

ही पण बातमी वाचा

👉किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज तीन लाखापर्यंत मिळणार कर्ज👈

या कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही जन्मतारीख बदलू शकता-

जन्म प्रमाणपत्र

पासपोर्ट

पॅन कार्ड

बँक पासबुक

ट्रान्सजेंडर आयडी

विद्यापीठाने जारी केलेले प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचा दाखला

पेन्शन पेपर

मेडिक्लेम प्रमाणपत्र

व्हिसा कागदपत्रे

राजपत्रित अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र

👉आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक कराआणि नवीन माहिती मिळवा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!