मनोगतसंपादकीयसामाजिक कट्टा

लोक काय म्हणतील ?

राम ढेकणे ह्यांचे मनोगत

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात हे शब्द कोणी कोणी वापरले असतील किंवा तूम्ही या वाक्याचा विचार करून काही गोष्टी केल्या नसतील.या वाक्यात एवढी ताकद आहे की काही जण आपल्या आयूष्यातील निर्णय ,आपण काय काय करायचे हे या वाक्याचे उत्तर जर सकारात्क त्यांना वाटत असेल तर ते त्या प्रमाणे निर्णय घेतात.

आपल्या घरातील सर्वसामान्य उदाहरण म्हणजे आपले केस .आपले केस आपण किती वाढवायचे ,आपण किती बारीक ठेवायचे हे काही जण लोक काय म्हणतील म्हणून एखादी हेअरस्टाईल आवडत असेल तरी करत नाहीत कारण त्याच्या कडे लोक काय म्हणतील या प्रश्नांचे उत्तर नकारात्मक असते.

तसेच काही जणांचे आईवडील आपल्या मुलांना केस वाढवू देत नाहीत ,केस कापले नाहीतर तू टपोरी दिसशील,मला नेहमी हा प्रश्न पडतो की टपोरी आणि केसांचा काय संबंध आहे..

आपल्या केसावर आपण प्रेम नाही करायचे तर कोण करणार,आपण आपले केस हवे तेवढे वाढवायचे की ते तसेच ठेवायचे हे दुसऱ्या काय वाटेल म्हणून आपण का कापायचे

माझ वैयक्तिक असे मत आहे की केस कापण्या पेक्षा ,केसाची निगा कशी राखायची ,केस कशे सुंदर ठेवायचे ,पावसाच्या दिवसात आपल्या केसाची निघा कशी राखायची या गोष्टी त्याला शिकवल्या पाहिजे.

मुलींच्या बाबतीत तर अजूनही काही ठिकाणी मूलींना केस कापण्याचा अधिकार नाही.मूलींना लांब केस असणे हे त्यांच्या सौदर्यांमध्ये भर टाकते ते एका परी ने बरोबर आहे .पण समजा काहींना वाटले तर आपले केस आपण छोटे केले पाहिजे तर त्यांच्या घरचे तसेच लोक काय म्हणतील या वाक्याच्या भिती मुळे मुलींना केस कापू देत नाहीत..केस कापणे सुध्दा अधिकार काहींना या लोक काय म्हणतील या वाक्यामुळे भेटत नाही.

हेही वाचा : कल्याणकारी निर्णयांचे मनापासून स्वागत.

एखादी गोष्ट आपल्याला करू वाटते पण लोक काय म्हणतील म्हणून काही जण करत नाहीत.

लोक काय म्हणतील या मुळे बहूतेक जण त्यांना असलेले स्वातंत्र्य सुध्दा उपभोगू शकत नाही..

त्यांच्या मध्ये आत्मविश्वास कमी होत जातो या वाक्यामूळे लोक काय म्हणतील

काही जण कपडे परिधान करताना सुध्दा विचार करतात की लोक काय म्हणतील

काही जण मित्र मैत्रींनी बरोबर बाहेर कुठे गेले आणि मोठयाने सुध्दा बोलत नाही ,किंवा कुठे हॉटेल मध्ये जेवणासाठी गेले तर तेथे सुध्दा काही जण तोंडातून आवाज काढत नाहीत लोक काय म्हणतील म्हणून

एवढा परिणाम लोकावर या तीन शब्दांचा झाला आहे की आपले सर्व जीवन काही जण या शब्दाच्या आवती भोवती घालवतात..

काही जण कार्यक्रमामध्ये जातात ,समोरचा व्यक्ती विचारत असतो की तूम्हाला काय प्रश्न असतील तर विचारा,तर काही जणांच्या मनात भरपून प्रश्न असतात पण ते लोक काय म्हणतील यामुळे ते विचारू शकत नाही.

काही जण चार चौघासमोर आपले मत व्यक्त करू शकत नाहीत कारण त्याच्या मनात हाच प्रश्न असतो की लोक काय म्हणतील.

जॉईन करा आपल्या जिल्हयाचा व्हाट्सअँप ग्रुप

काही व्यक्ती बाजारात उपलब्ध् असेलेली हाफ चड्डी सुध्दा घालत नाहीत कारण काय तर लोक काय म्हणतील

अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूचे व्यक्ती या लोक काय म्हणतील या वाक्यामुळे करत नाहीत..आणि मनात असून सुध्दा ते तसेच आपले आयुष्य जगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!