मनोगतसंपादकीयसामाजिक कट्टा

प्राण्यांना झू मध्ये ठेवणे योग्य आहे का ?

छ.संभाजी नगर ला आम्ही पोहचलो, तेव्हा प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. खूप सारे प्राणी त्या प्राणीसंग्रहालयामध्ये होते. प्रत्येक जातीच्या प्राण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी राहण्याची , फिरण्याची व्यवस्था केली होती आणि त्या चारी बाजूंनी ते बाहेर येउन आपल्याला हानी पोहचवणार नाहीत याच्या साठी जाळी बसवली होती. म्हणजे काही चौरस फूटाच्या बाहेर त्यांना जाता येणार अशी अवस्था.

हरिण, काळवीट, कोल्हा, बदक, मोर, रानगाय, ससा, वाघ, पांढरा वाघ, खूप सारे साप, अजगर, नाग, मगर, माकड, बिबटया अजून भरपूर प्राणी होते पण मला त्यांची नावे आठवत नाहीत.

या अशा सर्व प्राण्यांना आपल्यासाठी एकत्र ठेवणे ,आणि चार पैसे कमवणे योग्य आहे का ?

त्यांना बोलता येत नाही म्हणून त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार का ?

कोणी तूम्हाला अधिकार दिला त्यांना कैद करण्याचा ?

त्यांनी काही गुन्हा केला आहे का ?

त्यांनी तूमच्या वर हल्ला केला आहे का ?

त्यांनी काहीही गुन्हा केला नसेल, त्यांनी आपल्याला त्रास दिला नसेल तर मग आपण कोणत्या अधिकाराचा वापर करुन त्यांना कैद केले आहे हा मनाला प्रश्न पडतो.

आपल्या मुलभूत कर्तव्यामध्ये सरल पणे उल्लेख आहे की प्राणी मात्रावर दया करा. त्याच्या वर प्रेम करा. मग आपण आपल्या सुखासाठी, आपल्या मनाला आनंद मिळावा आणि त्यांना वेळोवेळी पाहता यावं आपल्या लहान पोरांना मज्जा घेता ह्यावी म्हणून त्यांना कैद करून ठेवणार का ?

आपण आपल्या काराग्रहात ठेवत असलेल्या माणसात आणि त्या प्राण्यांत काय फरक राहिला ? फक्त एवढेच की त्यांना आपण काम सांगत नाही. पण त्यांचे स्वातंत्र्याचे काय ते तर त्यांनी गमावलेच ना.

त्या ठिकाणी एक बिबटया होता, त्याला साधे हालता येत नव्हते, म्हणजे शेळी सारखी त्यांची अवस्था झाली होती, त्यांना आता आपल्याकडे काही नैसर्गिक शक्ती आहे याची जाणीव संपली होती.

जेवढे जंगलावर तसेच जमीनीवर आपला आधिकार आहे तेवढाच त्यांचा पण आहे. आपल्याला फक्त माणसांची काळजी, माणसांसाठी आपल्यात मनात माणूसकी, त्यांच्यासाठी का नाही आपल्या मनात प्रेम, का त्यांना जगू देत नाहीत त्यांच्या मनासारखे, तूम्हाला या पृथ्वी वर कुठेही जाण्याचा अधिकार आणि त्यांना साध त्यांच्या सारख्या प्राण्यांमध्ये सूध्दा फिरण्याचा अधिकार तूम्ही देत नाहीत तोहि आपण हिस्कावून घेतआहोत.

एकतर आपण आपली लोकसंख्या वाढली म्हणून आपण त्यांची जागा आता वापरत आहोत आणि त्यांच्या जंगलात जाउन त्यांनाच राहण्यासाठी आता जागा शिल्लक नाही म्हणजे आपण त्यांच्या अप्रत्यक्षपणे घरावर ताबा मिळवला आहे. एखादे देशाचे सैनिक चूकून आपल्या देशातील बार्डरवर पाउल ठेवले तर आपण पूर्ण जगाला ओरडून ओउडून सांगतो की यांनी अस अस केले आमच्या बरोबर. मग अशा प्राण्यांनी कोणाकडे तक्रार करायची आपली ?

का आपण त्यांचे घर उदध्वस्त करत आहोत. कोणी दिला आपल्याला हा अधिकार ?

प्रत्येक देशाने राहत असलेल्या ठिकाणी ३३ टक्के राखीव जमीन हि जंगल साठी ठेवणे हे गरजेचे आहे.पण ते अमलात होताना दिसत नाही. आपल्याला ह्याचे परिणाम माहित आहेत, त्या प्राण्यांना त्रास होतो हेही माहित आहे पण कळत पण वळत नाही आणि नेमकं करायचं कोणी हा प्रश्न आहे आपल्यासमोर.

जसे आपण त्यांच्या घराकडे वाटचाल करू ते आपल्या घराकडे येतील आणि मग पुन्हा मनायच की प्राणी आपल्याला त्रास देत आहेत. शेताचे नुकसान करत आहेत, आपण त्यांचे घरे उध्दवस्त केले तरी त्यांनी शांत रहायचे, का एवढा अन्याय करतो आपण त्यांच्यावर.

आपल्या भारत सरकारचे तसेच पूर्ण जगाचे कर्तव्य आहे की प्राण्यांचे स्वातंत्र्य तसेच त्यांचे निवास स्थान जंगल टिकवून ठेवणे पण जग कायदा करत आहे त्याची अमलबजावणी करताना कुठेतरी आपण कमी पडत आहोत.

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!