मनोगतराजकीय कट्टा

उद्धव ठाकरे ह्यांना पत्र

उध्दवराव तुमचे खोटे, उसने धैर्य आणूनचे बोलणे आम्हाला तेव्हाच समजले होते, जेव्हा बाळासाहेबांना तुम्ही वचनपूर्ती म्हणून मुख्यमंत्री पद, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून स्विकारत आहात, असे सांगितले होते! तुमचा स्वार्थ, पुत्रप्रेमाने अंध झालेला धृतराष्ट्र स्वभाव तुमच्या शामळू चेहऱ्यावरून लपविला जात नव्हता! आज तुम्ही सांगत आहात, शरदकाकांनी सांगितले म्हणून मुख्यमंत्री पद स्वीकारले. जे तत्व बाळासाहेबांनी जन्मभर बाळगले, ते तुम्ही तुमच्या विचारांशी जुळत नसलेल्या माणसाचे ऐकून ब्रह्मचैर्य आणि गाढव दोन्ही घालवून बसलात. तुमचे बाळासाहेबांना दिलेले वचन स्वतःच्या बहुमताने सरकार बनवेन असे होते. तडजोड लबाडी करून मिळवेन, असे तर नव्हते!

तुमची प्रकृती ठीक नसल्याने काही महिने कोणालाही भेटत नव्हता,आम्हाला ही तुमच्या तब्येतीची काळजी होती, तुम्ही ह्या काळात तुमच्या कोणीही विश्वासू सहकाऱ्याकडे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी देऊ शकला असता आणि हवी तेवढी विश्रांती घेऊ शकला असतात, पण कोणावरही विश्वास नाही अगदी आदित्य वरही, तुमचे चेले काँग्रेस बरोबरची युती मान्य करत नाही म्हणून ते वेगळे होताहेत,त्यांचा तुम्हावर मुळीच राग नाही. शिवसेनेच्या आणि तुमच्या हिंदूत्वाबद्दल आमच्या मनात कोणताही शंका नाही,कारण तुमचे हिंदूत्व अभिमान बेगडी,मतांसाठी ओशाळलेले आहे. तुमचे आजचे भाषण हे हताशपणा दाखवत होते. तुम्ही राजिनामा स्वतः चे आमदार फुटले म्हणून द्यावा,हे आम्हालाही पटत आणि रुचत नाही. पण तुमच्या सभोवताली जमलेले शकुनीआणि कर्ण तुम्हाला सुखाचा श्वास आणि मोकळेपणाने विचार ही करू देत नाहीत हे जाणवतं आहे. तुम्ही सदन भंग करण्याचा पवित्रा घेतला आहे असे कर्ण राऊत सांगत होते, पण समजा उद्या निवडणूक लागलीच तर शिवसेनेच्या दोन गटांतील मतविभागणी नंतर दोन आकडे तरी दिसतील काय? एक मात्र खरे, शिवसेना संपवण्याची राष्ट्रवादी ची खेळी कर्णराऊतांनी यशस्वी खेळली असे इतिहास मात्र जरूर सांगेल!

🙏 कोणाच्या भावना दुखावल्यास क्षमस्व 🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!