ब्लॉगिंग कट्टाशिक्षण कट्टासामाजिक कट्टा

होय आम्ही भ्रष्ट होणार

२०१९ च्या राज्यसेवा संयुक्त परिक्षेमधून उत्तीर्ण झालेले अधिकारी आज दुपारी  मार्गदर्शन करण्यासाठी  येणार होते ..त्याअगोदर मी माझ्या अभ्यासिकेमधील युवकाबरोबर संवाद साधला..काही जणांना मी सल्ला ‍ दिला की सर आले की त्यांना जे मनात आहे ते विचारायचे. त्यांनी सकारात्मकता दाखवली..आणि अशीच चर्चा चालू असताना आमचा विषय निघाला की सरकारी नौकरी भेटली तर तूम्ही भ्रष्टाचार करणार का ? तुम्हाला विश्वास बसत नाही सर्वांनी उत्तर दिले की होय आम्ही भ्रष्ट होणार..भरपूर पैसा कमवणार ,लाच घेणार ,कारण आम्हाला सर्व गोष्टीचा स्वाद घ्यायचा आहे ..प्रत्येक गोष्ट आम्हाला मिळवण्यासाठी ,एक अलिशान जीवन जगण्यासाठी आम्हाला भ्रष्टाचार करावा लागेल…सरकारच्या नौकरीच्या पगारातून आमची गरज नाही भागवता येत..त्यासाठी आम्हाला भ्रष्ट व्हावे लागणार..आणि आम्ही भ्रष्ट होणारच..जशी दुनिया तशी आमची नियत ..

 मला समजा एकाने उत्तर अशा प्रकारे दिले असते तर काय वाटले नसते,पण माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक युवक मी भ्रष्टाचारी होणारच …अशा मोठया आत्मविश्वासाने म्हणत होता..त्याला हे बोलताना कसलीही लाज वगैरे वाटत नव्हती..त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्यांचे बोलणे एकच होते..

मी प्रश्न विचारला ,का तूम्ही भ्रष्ट होणार ? तर त्यांचे उत्तर न पटण्यासारखे होते..त्यांचे असे विचार होते की विजय माल्या,चौक्सी ,ललित मोदी,अनिल देशमुख हे देशाला फसवून फरार होतात,काही जण येथेच आहेत तरी त्यांच्या वर काहीच ॲक्शन होत नाही, चौकशी केल्यासारखे आपल्याला दाखवतात,आणि विषय मधल्या मधी दाबला जातो..कोणाला शिक्षा पण होत नाही…दुसरे कारण त्यांचे असे होते की आतापर्यंत प्रत्येक सरकारी दफ्प्तर मध्ये आमचे काम सहजा सहजी  होत नाही.साधा आधार कार्ड वरचे नाव बदलायचे म्हंटले तरी लाच दयावी लागते.

प्रत्येक कागदपत्रे लाच दिल्याशिवाय निघत नाहीत..

माझ्या हक्काचे रेशनचे धान्य सुध्दा  लाच दिल्या शिवाय भेटत नाही.

शिपाई पासून ते मोठ मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत काहींना काही रक्कम पोच करावीच लागते..घरातील काही अडचणी असतील नगरपालिकेमध्ये तरी वेळेवर होत नाहीत ,लाच दिल्याशिवाय कुठलेच काम होत नाही.

दुसरे त्यांचे कारण होते की आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला लाच घ्यावीच लागेल..

त्यांना म्हंटले स्वप्नच पूर्ण  करायचे आहेत तर एखादा व्यवसाय सुरू करावा..किंवा एखाद्या चांगल्या कंपनी मध्ये नौकरी करावी..सहज १० – १२ लाख कमवू शकता ,तर एक जण म्हणाला ,कि सरकारी नौकरी लागली तर एका महिन्यात मी तेवढे कमवू शकतो..कधी कधी जास्त पण कमवू शकतो..

  सिस्टीमच भ्रष्ट असेल तर आम्ही का चांगले राहणार ,आम्ही पण भ्रष्ट होणारच…

तूम्ही सिस्टीम मध्ये बदल करा,याच्या वर एक जण म्हणाले की जर फक्त तू चांगला असेल बाकीचे तूझ्या आजूबाजूला असतील तर ते तुलापण भ्रष्ट बनवतात..नाहीतर अशा ठिकाणी बदली करतात की त्या ठिकाणी काहीच काम नसेल आणि तूला त्रास दयायला चालू करतात.

सिस्टिम मध्ये टिकायचे असेल तर भ्रष्ट व्हावेच लागेल..

तूम्ही तरूण आहात असा विचार केल्यावर आपला देश ‍ कसा सुधारेल.

चर्चा चालू होती तेवढयात प्रमुख पाहूणे आले..आणि कार्यक्रमाला सुरूवात झाली..

मी प्रमुख पाहूण्यांची ओळख करून दिली ,त्यांना विनंती केली की सर आम्हाला तूम्ही मार्गदर्शन करावे.

सातत्य ठेवा,मन लावून अभ्यास करा..स्वत: शी प्रामाणिक रहा..,त्यांचा भर जास्त होता की आतापर्यंत झालेल्या प्रश्नांवर ..जेवढया जास्त प्रश्न तुम्ही सोडवणार तेवढी लवकर तूमची पोस्ट तूम्हाल मिळेल..झालेल्या प्रश्नपत्रिकेचा चांगला अभ्यास करा..एकदा का प्रश्नांचे स्वरूप तुम्हाला कळाले मग काय बाकी गोष्टी सहज तूमच्या लक्षात येतील..एक दिवस नक्की तूम्ही अधिकारी होणार जर प्रश्नत्रिकेचा नीट अभ्यास केला तर..अशा अनेक मुद्दयाला हात घालून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले…आयुष्यात कशाची पण गरज लागली तर माझ्याशी संपर्क करा…मी नक्की मदत करेन .

शेवटी मी समारोप करताना आमच्या तर्फे स्वामी विवेकांनदाचे छोटेसे पुस्तक भेट म्हणून आम्ही सरांना दिले..आणि सरांनी आमचा  निरोप घेतला..

 पण हे सर्व अधिकारी होतील पण अगोदरच यांनी मनामध्ये लाच घ्यायचे ठरवले असेल कारण सिस्टिम च तशी आहे..आपल्याला पण लाच घ्यायला भाग पाडते.वगैरे वगैरे आम्ही भ्रष्ट होणारच..हा जर पण लावूनच अधिकारी होणार असतील तर भारतातील भ्रष्टाचार कधीच नष्ट होणार नाही..जो पर्यंत चांगले अधिकारी भारताला लाभत नाहीत तोपर्यंत भारतातील भ्रष्टाचार चालूच राहील..त्यामुळे विकास योजना कितीही तयार केल्या तरीही या अशा लोकांमुळे विकास संथ गतीने होत राहील…भारत विकसनशील देशच राहील.. विकसित देश होण्याचे स्वप्न स्वप्नच राहील..

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!