जॉब कट्टाब्लॉगिंग कट्टासामाजिक कट्टा

वापरा आणि गरज संपली की फेकून द्या ?

हमे मालूम हे वक्त हमारा गुजर गया हे लेकिन आज भी हम करण अर्जून की मॉ की तरह ही इंतजार में हे की  फिरसे  मेरा वक्त आयेगा ,फिरसे मेरा वक्त आयेगा.

२०१९ पर्यंत रात्रदिवस एक करून विद्यार्थी अभ्यास करत होते .. वेगवेगळया परिक्षेसाठी फॉर्म भरले होते.गरिब घरातील मूलाकडे एक तर स्पर्धा परिक्षा नाहीतर कमी पगारी वर पूणे- मुंबई येथे जाउन काम करणे याच्या शिवाय त्यांना दुसरा पर्याय नसतो.मग काय खूप जण स्पर्धा परिक्षेच्या तयारीला लागतात..

  तसेच आपल्या भाकरीची सोय होईल म्हणून स्पर्धा परिक्षेच्या तयारीला लागले होते.कोणी कल्पना केली नव्हती पण जे होयचे त्याला कोण रोखणार या प्रमाणे कोरोना नावासा वायरस आपल्या आयुष्यात आला आणि त्याने सतत धावणा-या आपल्या आयूष्याला ब्रेक लावला..व्यवसाय ठप्प झाले,छोटे व्यवसायाचे तर कंबरडेच मोडले,रस्त्यावरील व्यवसाय करून दोन वेळेचे खायला मिळणाऱ्यांची तर हाल विचारू नका एवढी  खराब झाली होती हे सर्वांना माहीतच आहे..एक गोष्ट तुम्हाला माहित नाही ती म्हणजे शासनांनी आमच्या सारख्यांचा वापर केला आणि गरज संपली की त्यांना वाऱ्यावर सोडून दिले..

करोना  मुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांवर खूप ताण पडला होता..मग काय हा ताण कमी करण्यासाठी त्यांनी नौकर भरती करण्याचे ठरवले ..त्याप्रमाणे वेगवेगळया  विभागातील पदवी प्राप्त असलेल्या असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी दिला..शिपाई पासून ते डॉक्टर पर्यंत भरती साठी अर्ज मागावले..

मग काय ज्याला पैशाची अडचण असते तो मरणाला ही घाबरत नाही ..मग जे आमच्या मधले गरजवंत होते त्यांनी अर्ज केला..शेवटी जीव गेला तरी चालेल पण इज्जतीने मरू या विचारांने त्यानी अर्ज केला ..

८ घंटे काम करून ,वेळ लागली तर अतिरेक काम करून त्यांनी आपली सेवा केली ,महिन्याला १२००० रूपयांसाठी त्यांनी आपला जीव टांगणीला लावून काम केले..जे नौकरी करत होते त्यांच्या घरच्यांच्या मनात चार पैसे येत आहेत म्हणून आनंदी होयचं  का आपला मुलगा मरणाच्या दारात जाउन  दररोज मरण बघत आहे याच दु:ख मानायच अशा अवस्थेत होते..

काही जण तर घरी गेलेच नाहीत तेथेच हॉस्पीटल मध्ये मुक्काम करत होते.प्रामाणिक पणे नौकरी केली.   मास्क आणि त्यांचा ती कीट घालून त्यांनी  ८ घंटे काम केले..काही जणांना आपला जीव गमवावा लागला..काही जणांना करोना झाला पण त्यांनी हार माणली नाही लगेच काही दिवसात कामावर रूजू झाले.

करोनाची लाट जशी जशी कमी होत गेली याच्यावरचा ताण पण कमी झाला..मग काय सरकार ला आता वाटायला लागले की आपल्या अर्थव्यवस्थेवर ताण यायला लागला आणि तसेही यांना नौकरी देताना सराकरने ११ महिने किंवा  काही कालावधी साठी यांना नौकरी वर घेतले होते..करोना गेला आणि यांची नौकरी पण गेली..

सरकार हळू हळू ज्यांना घेतले त्यांना कमी करू लागले,एका वर्षांत ज्यांना घेतले होते त्यांना सगळयांना यांनी घरचा रस्ता दाखवला…

ज्या सरकारसाठी यांनी आपल्या जीवाचा सुध्दा विचार केला नाही आज त्यांची भाकरी त्याच सराकरने काढुन घेतली ..काय वाटले असेल त्यांच्या घरच्यांना ,काय वाटले असेल त्यांना ..की आपण ज्यांची सेवा केली त्यांनी आपला वापर केला आणि वापर संपला की फेकून दिले..

माझा सरकारला प्रश्न आहे की आपल्या देशात देशभक्त कशे तयार होणार जर तूम्ही अशा प्रकारे ज्यांनी सेवा केली त्यांना वाऱ्यावर सोडणार असाल तर…काही जणांचे लग्न झाले आहे या दोन वर्षात त्यांचा परिवार कसा जगणार आता ,याचा विचार सरकार करणार आहे का,

मान्य आहे तूम्ही अगोदरच सांगितले होते की ही तात्पूरती नौकरी आहे..पण ज्यांनी आपल्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावले त्यांचा तूम्ही विचार करणे गरजेचे आहे का नाही,कसे देश भक्त तयार होणार,त्यांच्या मनात आपल्या देशाबद्दल प्रेम राहिल का, का त्यांना तूम्ही दुसरी मदत करत नाहीत..

कमीत कमीत हा कालावधी संपल्या नंतर काही तरी व्यवसाय करण्यासाठी निधी तर दयायला पाहिजे होता सरकारने..

कमीत कमीत त्यांची भाकरीची तर सोय झाली असती..झालेला अन्याय दूर करता येईल परत त्यांना कामावर इतर ठिकाणी घेतले तर ‍ किंवा त्यांना व्यवसाय करण्यासाठी निधी दिला तर .. बंद करा हे तुमचे धोरण वापरा आणि फेकून देण्याचे..

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!