ब्लॉगिंग कट्टासामाजिक कट्टा

पावसाळा ऋतू – कोणासाठी आनंददायी तर कोणासाठी वेदनादायक

पावसाळा ऋतूकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे.या ऋतूचा आयुष्यावर होणारा परिणाम सुध्दा प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे.या ऋतूचा प्रत्येक भागानुसार परिणाम वेगवेगळा आहे..कधी हा ऋतू कोणाच्या उपयोगाला येतो तर कधी हा ऋतू काही जणांना त्रास देतो.कधी हा ऋतू काही जणांची तहान भागवतो,कधी हा ऋतू काही जणांचे जीवन हूसकावून घेतो.कधी या ऋतू मुळे काही जणांचे उत्पन्न वाढते तर कधी या ऋतू मुळे काही जणांना आहे त्या उत्पनावरही पाणी सोडावे लागते. या ऋतू मुळे आपण जीवंत आहोत तर काही ठिकाणी या ऋतू मुळे जीव गमवावा लागत आहे. असा कसा रे तू भेदभाव करतोस ,का आमच्या इवलूशा  जीवाला  त्रास देतोस,

    नेहमी प्रमाणे दैनंदिन क्रिया करून अभ्यासिका मध्ये गेलो..काळ चालू झालेला पाउस अजूनही चालू होता..आश्रमामधील मंदिराचे बांधकाम चालू आहे..अचानक त्या बांधकामाकडे लक्ष गेले आणि बधतोय तर चार जण काम करत होते.एक ४० वयाच्या आसपास असणारी महिला आणि तीन पुरूष .त्यामधील एक ५० च्या पूढे वय असणारे ‍ वयस्कर व्यक्ती आणि बाकी ३० च्या आसपास..वयस्कर व्यक्ती खडी,सिमेंट,डस्ट मिक्स केलेले मिश्रण खोऱ्यांनी टोपल्या मध्ये भरून त्या महिलेला देत असे आणि ती महिला लोखंडी टेबला वर उभा असलेल्या पुरूषाकडे ते टोपले देत असे आणि तो भितींवर उभा असलेल्या दुसऱ्या पुरूषाकडे ते टोपले देत असे..आणि तो पूरूष तो भीम भरत होता..हे सर्व क्रिया चालू होती पावसामध्ये…

गार वारे सुटलेले होते,रिमझिम पाउस पडत होता,तरूण पुरूषाचे ठिक होते पण त्या महिला आणि तो वयस्कर व्यक्ती याच्या बद्दल वाईट वाटू लागले…की अशा भर पावसामध्ये त्यांना काम करावेच लागत आहे..कितीही वेदना होत असल्या तरी ते दोघेजण काम करत होते..

 पण मला आनंद या गोष्टीचा झाला की असल्या पावसामध्ये सुध्दा त्यांना काम मिळाले ,चार पैसे त्यांच्या खिशामध्ये आजही जमा होतील.यांनी दुसऱ्या बाजूला असाही प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला की पावसाळयात यांना काम मिळत असेल का..म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो आणि विचारलं,की दादा तुम्हाला पावसाळयात दररोज काम मिळत का आणि काम मिळाले आणि अचानक पाउस पडला आणि तुमचे कामामध्ये अडथळा आला तर त्या दिवसाची हजेरी तुम्हाला मिळते का.

तर याचे उत्तर सकारात्मक आले..त्यांनी सांगितले की काम पावसाळा मध्ये मिळते  आणि हजेरी पण मिळते.पण पावसामध्ये काम करताना अडचणी येतात..काम पटकन पटकन होत नाही.. हे एकून बरे वाटले,अडथळे येउ दयात पण तुम्हाला काम मिळते हे महत्वाचे.

काही जण या ऋतू मध्येही आपल्या  ऑफीस मध्ये बसून नेहमी प्रमाणे काम करत असतात तर काही जण या पावसाच्या परिणामाला सामोरे जात असतात.

गल्ली गल्लीने भाजी घेउन फिरणारे पाउस पडत असेल तर दिसत नाहीत..जर त्यांचे याच व्यवसाय वर पोट असेल तर या ऋतू मध्ये त्यांनी कसे जगायचे ..त्यांच्या वर तर या ऋतू चा खूप परिणाम होत असेल.

ज्या भागामध्ये धरण आहेत ,प्रचंड पाउस झाल्यामुळे जर वर्षी धरणाची दारे उघडावी लागतात,त्यामुळे होणारे नुकसान तर शब्दात सुध्दा सांगता येत नाही एवढे मोठे नुकसान होते.

आपली एखादी वस्तू हरवली तर आपल्याला प्रचंड राग येतो..पण ज्या भागात पूर तसेच मानवी चूकामुळे येणारा पूर येत असेल तर त्यांचे पूर्ण संसार उध्वस्त्‍ होतो.त्यांना किती राग येत असेल,‍ ‍ किती वेदना होत असतील.

काही कवी पावसाळा ऋतू आला जर कविता  करतात चांगल्या चांगल्या ,काही जण पावसाळा या ऋतू मध्ये एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देतात.काही जण घरामध्ये राहूनच वेगवेगळया  पदार्थाचा स्वाद घेतात.काही जण घरात राहून आजूबाजूला या ऋतूमुळे घडणाऱ्या वाईट वा चांगल्या गोष्टीचा आनंद घेतात टि.व्ही च्या माध्यमातून.

सांगायच तात्पर्य की हा ऋतू दिसतो तेवढा साधा ऋतू आपल्याला म्हणता येणार नाही.पाउस प्रचंड पडला की झाल आता पाण्याचा प्रश्न मिटला..अस नाही..हा येतो आणि प्रचंड प्रमाणात वेदना देउन पण जातो आणि प्रचंड प्रमाणामध्ये आपल्यावर उपकार ही करून जातो. लेखक : राम ढेकणे

येतोस तू

वाटेल तेवढा तू पडतो तू

तूला वाटेल त्या भागात त्रास देउन जातोस तू

जिथ गरज आहे तुझी तिथे साध फिरकत सुध्दा नाहीस तू

बिना मनाचा तर नाहीस ना तू

अवेळेस येतोस तू

तोंडाशी आळेला घास हिसकावून घेतोस तू

काही जणांना रडवून जातोस तू

तर काही जणांना हसवून जातोस तू

वेळेवर येत जा तू

प्रत्येक भागात लागेल तेवढाच पडत जा तू

जीवन म्हणजे आमच तू

हे तूला माहीत आहे म्हणून तू भाव खातोस तू

हो आम्ही निष्काळजी पणाने वागतो आम्ही

म्हणून असा तू वागतोस का तू

ठीक आहे तर असेल तर

आम्ही शपथ घेतो

तूझा उपयोग लागेल तेवढाच करू

मग तर वेळेवर येतोस का तू

कवि : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!