मनोरंजन कट्टासामाजिक कट्टा

देवाशी एकरूप होण्याचे साधन म्हणजे : वारी

वारी म्हणजे  आपली पंरपरा जपण्याचे एक मूख्य् घटक. वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी उत्स्व ,वारी म्हणजे पृथ्वी वरील स्वर्ग .वारी म्हणजे पापातून मुक्त्‍ होण्याचे साधन ,वारी म्हणजे चूका कबूल करून नवीन सुरूवात करण्याचे माध्य्म,वारी म्हणजे सभ्य्पणाची जाणीव ,वारी म्हणजे प्रेमाने भरलेला जनसागर,वारी म्हणजे शिस्तीचे दर्शन ,वारी म्हणजे परमेश्वरांची भेट ,वारी म्हणजे भारतीय संस्कृतीची ओळख,वारी म्हणजे देवावरील लोकांनी दाखवलेले प्रेम,वारी म्हणजे देव आणि भक्त्‍ एकरूप होणे.

 पहिली वारी शंकरांनी केली होती. दूसरी वारी हैवत राव ,तिसरी वारी भानूदास यांनी केली .चौथी वारी संत ज्ञानेश्वरांनी  केली,पाचवी वारी संत तूकाराम यांनी केली .संताच्या गावापासून पंढरपूरापर्यंत विठठलाच्या भेठी साठी चालत ,भजण म्हणत ,आनंदाने नाचत ,गात,खेळ खेळत ,विठठल नगरी मध्ये भक्त्‍ /वारकरी जातात.वारी म्हणजे आपल्याजवळ असलल्या षडविकारावर मात करणे म्हणजे वारी करणे.वारी केल्यामूळे माणसामधील जात,पात धर्म ,वर्ण हे सर्व समूळ नष्ट् होतात,त्यांच्या ठिकाणी एकच शब्द् रूढ होतो तो शब्द् महणजे एकमेकांना माउली या नावाने संबोधतात,वारी मध्ये ज्ञानेश्वर् माउली ,ज्ञानराज माउली,संत तुकाराम या संताच्या नामाचा जयघोष केला जातो,वारीतील प्रत्येक माणूस विठ्ठलाच्या भेठीसाठी आवडीने पंढरीकडे जात असताना ज्ञानोबा तूकाराम या संताचा नामघोष करत जातात देवाकडे, मात्र नाम घेतात संताचे त्यामुळे देवास आवडणाऱ्रा संताचे नाव घेतल्यामुळे नाव घेणाऱ्यामध्ये जवळ असलेल्या चैतण्य रूपी आत्म्याचे  आणि ईश्वराय तत्वाचे एकरूप होते.व आनंद निर्माण होतो.म्हणजे जीव आणि शीव यांची एकरूपता ज्या क्रियेमध्ये होते त्याला वारी म्हणतात ,यामध्ये वारकरी आनंदाने, समाधाने ,संतुष्ठ् राहतात, फक्त्‍ आनंद आणि फक्त्‍ आनंद, आनंद म्हणजे परमात्म्याशी जोडणे,वारीकेल्यामुळे  इतर भौतिक विषयाबद्दल  आकर्षण कमी  होते.आळंदी होउन ज्ञानेश्वरृ माउलीची,त्र्यंबकेश्वरवरून निवृत्ती नाथाची,सासवडवरून सोपान काकांची ,देहूवरून संत जगतगूरू तूकाराम महाराजांची ,पैठण वरून संत एकनाथ महाराजांची,शेगाव वरून श्री संत गजाजन महाराजांची पालखी देवाच्या भेटीला निघतात.

पालखी मध्ये संताच्या पादुका आणि मुर्ती असते,त्याचबरोबर ध्वज्  ,पताका,मृदंग ,विणा,चिपळया ,तसेच गाणारे ,वाजवणारे,गायक ,किर्तणकार ,प्रवचन कार,संस्थाने ,भाविक भक्त्‍,अन्न्दाते,ज्ञान दाते,कर्मयोगी,श्रमदान करणारे,आणि इतर मंडळी पालखी बरोबर संताचा जयजयकार करत,देवाचे नाव घेत,वाटचाल करीत असतात,प्रत्येक पालखी ज्या ठिकाणी मूक्कामी राहते,त्या ठिकाणी रात्री ‍किर्तन,भजन ,जागरण,पहाटेची काकड आरती,पूजा  करून दुस-या दिवशी पूढील वाटचाल करते,कमीत कमी दररोज २५/३०कि मी चा दररोज प्रवास होतो,या प्रवासात सर्व जातीधर्मांचे लोक सामील होतात,येथे कोणताही भेदभाव केला जात नाही,असा प्रवास काही पालखी १० दिवस ,काही पालखी १५ दिवस ,काही १८दिवस ,काहींना तर एक  महिना पोहचायला वेळ लागतो पण त्यामध्ये दोनशे ते आडीशे किमीटर चा प्रवास करून देखील भक्त् आजारी पडत नाहीत,पहिल्या दिवशी जी उर्जा होती त्याच्या कितीतरी पठ उर्जा त्यामध्ये निर्माण होते.उर्जा म्हणजे चैतण्य्,तेज,आनंद यातच आपल्याला परमांनदाची प्राप्ती होते,

आषाढी शुध्द् एकादशीला पंढरपूर येथे वारकरी जमा होतात. आषाढि कार्तिक ,मार्ग,चैत्य् या महिन्यातवेगवेगळया ठिकाणाहून भक्त पंढरी कडे प्रस्थान  करतात,प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षात एकादशी या ‍ दिवशी भक्त पंढरीच्या भेटीला येतात.वारी प्रत्येकाने करायला हवी,आपल्या देवाची ओळख करून घ्यायला हवी,वारीचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे,आपली पंरपंरा आपण एकजूटीने जपली पाहिजे ,परदेशी विचारापेक्षा आपली संस्कृतीचा विस्तार पूर्ण जगामध्ये करण्यासाठी आपल्याला वारी करून आपण आपली संस्कती जपली पाहिजे.वारी हा जागतिक उत्सव कसा होईल याची जबाबदारी आपण घेतली  पाहिजे.

देव पहावया गेलो देवची होउनी ठेलो या उक्ती प्रमाणे देव पाहायला गेलेले दर्शनासाठी गेलेले देवरूप होतात.होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, येणे साधती साधणे तुटती भवाची बंधंने ,संताविन प्राप्ती नाही,ऐसे वेद देती ग्वाही ,ऐका जणाधर्नी संत पूर्ण करती मनोरथ .

प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये वारीची ओढ असते,कारण गेल्या आठ पिढी पासून वारी ची पंरपंरा चालू आहे म्हणून तूकाराम महाराजांनी आपल्या अभंगात वारीचे वर्णन केले आहे.अभंग असा की .

पंढरीची वारी आहे माझ्या घरी ,आणिक न करी तिर्थव्रत

व्रतएकादशी करीन उपावासी

गायीन अहर निशी मूखे नाम

नाम विठोबाचे घेईन मी वाचे

बीज कल्पांतीचे तूका म्हणे

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!