ब्लॉगिंग कट्टामनोरंजन कट्टासामाजिक कट्टा

एका व्यक्तीने दोन लग्न करावे की एकच ?

काही दिवसापूर्वी एका मित्राचा सकाळ सकाळ कॉल आला आणि म्हंटला ,राम आज माझ लग्नं .थोडया मोठ्या आवाजामध्ये मी त्याला दोन शब्द ऐकवले..काय येडा बिडा आहेस का रे तू,आज लग्न आहे आणि आजच सांगतो लग्नाला ये..अजून थोडेसे संभाषण झाल आणि मी गेलो लग्नाला.

 हे त्याच दुसर लग्न होते.त्याला काही दिवसापूवी करोना झालता ,ज्या दवाखान्यामध्ये हा होता तिथे करोना झालेल्या मुलीची ओळख झाली.आणि ओळखीचे रूपातंर लग्नापर्यंत येउन पोहचले..काही दिवसात त्यांनी लग्न केले.काही दिवसामध्ये ती  दुसऱ्या पुरूषाबरोबर पळून गेली ..मित्राला खूप दु:ख झाले ,त्याला कळत नव्हते की काय करावे ,त्याची काहीच चूक नव्हती,त्या मुलीचे संबंध अगोदर पासून एका मुलाबरोबर होते ,हे त्या मुलीने लपवले आणि शेवटी माझ्या मित्राला धोका देउन पळून गेली. घटस्फोट पण देत नव्हती पैशाची मागणी पूर्ण केल्यावर त्या मुलीने माझ्या मित्राला मोकळे केले..त्यामुळे माझ्यामित्राला दुसरे लग्न करावे लागले. लग्नांच्या हार्दीक शुभेच्छा.

लग्नाला जाता जाता एका दुसऱ्या मित्राला सांगितले की अरे आपल्या मित्राच लग्न आहे..तो मित्र रागात म्हंटला ,अरे येथे माझ एक लग्न होत नाही,मला कोणी मूलगी देत नाही…हा पट्टया दोन दोन लग्न करत आहे..होईल एक दिवस असे म्हणून मी त्याचा निरोप घेतला..  या विधानावर जर जास्त वेळ तुम्ही विचार करावा. 

लग्नात आलो ,लग्न झाले..पण माझा मित्र सामान्य व्यक्ती,त्याच्या या गोष्टीचा समाजावर जास्त परिणाम होणार नाही..पण रात्री न्युज बघत असताना एक न्युज अशी आली की पंजाब राज्याचे मुख्यमंत्री दुसर लग्न करत आहेत..प्रथम मी त्यांचे अभिनंदन करेन की त्यांनी दुसऱ्या लग्नाची गोष्ट न लपवता ,सगळया जगाला माहित करू दिली.. काही शतक मागे गेलात तर असे जाणवेल की राजे,महाराजे  एकापेक्षा जास्त लग्न करायची .त्यांचा कारभार वाढवण्यासाठी ,राज्याला संरक्षण मिळवण्यासाठी वगैरे वगैरे ,पण आजच्या घडीला दुसर लग्न करण्याची वेळ येत असेल तर त्याचे कारण शोधले पाहिजे.एखाद्यी प्रतिष्ठीत व्यक्ती जर दोन लग्न करत असेल तर समाजाने त्याच्याकडे बघून काय शिकावे,एखाद्या राज्याचा मंत्री जर दोन लग्न करत असेल त्या राज्यातील जनतेने त्या कडून काय  शिकावे, पहिल्या बायको बरोबर घटस्फोट घेणे,आणि काही वर्षांनी दुसर लग्न करणे..यामध्ये आता मंत्र्याची चूक आहे की त्यांच्या बायकोची यात न पडता ,आपला मुळ मुद्दा असा आहे की दुसर लग्न करण्याची वेळ समाजातील लोकावर का येत आहे,…आणि ते पण अशा व्यक्तीवर जो राज्याचा गाडा चालवत आहे..अशी माणसं हिंसक,अहंकार,राग,मी पणा,गर्व यामध्ये अडकले आहेत..काही माणस शरीराच्या भूकेला प्राधान्य देउन वासनेला बळी पडली आहेत,तर काही माणसांकडे एवढा पैसा आहे की त्या पैशाच्या बळावर समोरच्या व्यक्तीला किंमत न देता,मान सन्मान न देता ,चांगली वागवणूक न देता पैशाने मी काहीही करू शकतो या विचाराने प्रवत्त झाले आहेत..त्यामुळे काही जण अशा माणसांना सोडून देतात आणि दोघे पण दुसरं लग्न करतात..

आता जो माणूस लोकांचे प्रतिनिधीत्व करतो त्याने दोन लग्न केले तर काय होईल..हळू हळू कुंटुब ही संज्ञा अस्तित्वात राहणार नाही..हळू हळू लोक एकमेकांचा वापर गरजे पुरता करतील ,स्त्री आणि पुरूष गरज असेल तोपर्यंत एकत्र राहतील आणि गरज संपली की ते एकमेकांना सोडून देतील.प्रेम ,आपूलकी ,आपलेपणा या गोष्टी कमी होतील..

आता काही जण म्हणत असतील की मुख्यमंत्र्यांना   व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे ..पण लोकावर त्याचा परिणाम होत असेल तर या गोष्टीला निर्बंध लावले पाहिजे..

सगळेजण जर दोन दोन लग्न करणार असतील तर येणाऱ्या पिढीचे लग्न कोणाबरोबर लावणार,एकतर मुलींची संख्या कमी होत असताना  प्रतिष्ठीत लोकांनी जर दोन दोन लग्न केले तर तरूण पिढींना लग्नांसाठी मुली मिळतील का.

खरच गरज असेल तर तुम्ही दुसरे लग्न करायला काहीही हरकत नाही,स्वातंत्र्याचा एवढा ही फायदा घेउ नका की त्याचा  परिणाम सामान्य जनतेवर होईल..एकतर घटस्फोट होयला न  पाहिजे ..त्यासाठी तुम्ही तुमच्या मधील राग,अहकांर ,द्वेष ,मी पणा ,दुसऱ्याला कमी समजण्याची भावना याच्या वर विजय मिळवला तर घटस्फोट होणार नाहीत..अशांनी लग्न दुसरे करावे ज्याच्या वर अन्याय झाला आहे..पण ज्याच्या वर कसलाच अन्याय झाला नाही आपल्या मनाला वाटल म्हणून लग्न करणार असाल तर त्याचा परिणाम समाजावर होणार आहे याची दक्षता घ्यावी…  

लेखक: राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!